Bakrid 2024: भारतात कधी साजरी होणार बकरी ईद? कशासाठी दिली जाते कुर्बानी? वाचा इतिहास

रमजानचा पवित्र महिना संपल्यानंतर जवळपास 70 दिवसांनी बकरी ईद साजरी केली जाते. या सणाला ईद-उल-जोहा असंही म्हटलं जातं. इस्लामिक कालगणनेतील अखेरच्या महिन्याच्या दहाव्या दिवशी बकरी ईद साजरी केली जाते. कुर्बानीचा उत्सव म्हणून या ईदचं महत्त्व आहे.

Bakrid 2024: भारतात कधी साजरी होणार बकरी ईद? कशासाठी दिली जाते कुर्बानी? वाचा इतिहास
Eid al Adha, Bakra EidImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Jun 16, 2024 | 12:17 PM

भारतात सोमवारी 17 जून रोजी बकरी ईद साजरी करण्यात येणार आहे. मुस्लीम समाजात रमजान आणि बकरी ईद हे मोठे सण म्हणून साजरे केले जातात. रमजान महिन्यात तीस दिवस उपवास करून रमजानची ईद साजरी केली जाते. तर बकरीर महिन्यात जवळपास दहा उपवास काहीजण करतात. बकरी ईदच्या दिवशी बकरा कुर्बान करून त्याचं मटण नातेवाईकांमध्ये आणि काही गरीब लोकांमध्ये वाटण्यात येतं. मुस्लिमांचे पैगंबर आणि हजरत मोहम्मद यांचे पूर्वज हजरत इब्राहिम यांच्या बलिदानाची आठवण म्हणून ही ईद साजरी केली जाते.

बकरी ईदचा इतिहास काय?

इस्लाम धर्मातील प्रमुख पैगंबरांपैकी हजरत इब्राहिम हे एक होते. इब्राहिम यांना त्यांचा एकुलता एक मुलगा सर्वाधिक प्रिय होता. त्यांना वयाच्या 90 व्या वर्षी पुत्रप्राप्ती झाली होती. अल्लाहने एकदा इब्राहिम यांच्या भक्तीची परीक्षा घ्यायचं ठरवलं. इब्राहिम यांच्या स्वप्नात येऊन त्यांनी त्यांच्या सर्वांत प्रिय गोष्टीचं बलिदान द्यायला सांगितलं. यावर इब्राहिम यांनी आपला प्रिय मुलगा इस्माईलचं बलिदान द्यायचं ठरवलं. इब्राहिम त्यांच्या मुलाची कुर्बानी देणार होतेच, इतक्यात अल्लाहने इस्माईलच्या जागी एक बकरा ठेवला. अल्लाह फक्त इब्राहिमची परीक्षा घेत होते. या परंपरेची आठवण म्हणून जगभरातील मुस्लीम ईद-उज-जोहा किंवा ईद-उल-अझहा साजरी करतात. या दिवशी बकरीची कुर्बानी दिली जाते. त्यामुळे भारतात याला बकरी ईद असं म्हणतात. ही ईद हजशी संबंधित आहे. या दिवशी जगातील लाखो मुस्लीम पवित्र मक्का शहराला भेट देतात. बकऱ्याची कुर्बानी देणं हा हजच्या यात्रेतील महत्त्वाचा भाग असतो.

हे सुद्धा वाचा

कुर्बान केलेल्या बकऱ्याचे तीन भागात विभाजन करून एक हिस्सा स्वत:च्या घरी, दोन हिस्से गरीब मुस्लीम धर्मीयांच्या घरात किंवा गरजूंना देण्याची प्रथा आहे. सकाळच्या विशेष नमाज पठणानंतर ही कुर्बानी दिली जाते. बकरी ईदनंतर एक महिन्याने इस्लामिक नववर्ष मोहरम साजरा केला जातो. भारतासह बकरी ईद पाकिस्तान आणि बांगलादेशात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.