उत्तराखंडमध्ये हिमस्खलनाने पुन्हा हाहा:कार, सैन्याने 430 लोकांना बाहेर काढलं, आठ जणांचा मृत्यू, अजूनही शेकडो अडकल्याची भीती

भारत-चीन सीमेजवळ सुमना क्षेत्रात आयटीबीपीच्या बटालियन पोस्टजवळ हिमस्खलन झाल्याने आठ लोकांचा दुर्देवी मृत्यू झाला (avalanche in Uttarakhand Joshimath).

उत्तराखंडमध्ये हिमस्खलनाने पुन्हा हाहा:कार, सैन्याने 430 लोकांना बाहेर काढलं, आठ जणांचा मृत्यू, अजूनही शेकडो अडकल्याची भीती
उत्तराखंडमध्ये हिमस्खलनाने पुन्हा हाहा:कार, आठ जणांचा मृत्यू, शेकडो माणसं अडकल्याची भीती
Follow us
| Updated on: Apr 24, 2021 | 4:00 PM

देहरादून : उत्तरखंडच्या (Uttarakhand) चामोलीत पुन्हा एकदा मोठी दुर्घटना घडली आहे. भारत-चीन सीमेजवळ सुमना क्षेत्रात आयटीबीपीच्या बटालियन पोस्टजवळ हिमस्खलन झालं (avalanche in Uttarakhand Joshimath). ही दुर्घटना शुक्रवारी (23 एप्रिल) संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय लष्कराला (Indian Army) या घटनेची माहिती मिळताच तातडीने बचावकार्याला सुरुवात करण्यात आली. हिमस्खलनामुळे अनेक लोक मलब्याखाली अडकल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत आठ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जवानांनी आतापर्यंत 430 लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढलं आहे. तर अजूनही 425 ते 430 लोक अडकल्याची भीती वर्तवली जात आहे.

दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू

भारतीय लष्कराचं अनेक तासांपासून बचावकार्य सुरु आहे. लष्कराच्या माहितीनुसार सुराई ठोसा येथून मलारी क्षेत्रापर्यंत अनेक ठिकाणी रस्त्यावर हिमस्खलन झालं आहे. बचावकार्यादरम्यान आज सकाळी साडेसात वाजता दोन मृतदेह जवानांना सापडले. त्यानंतर 9 ते 10 वाजेदरम्यान सहा मृतदेह सापडले. दुसरीकडे जखमींना तातडीने वायूसेनेच्या हेलिकॉप्टद्वारे जोशीमठे येथील सेनेच्या रुग्णालयात नेलं जात आहे (avalanche in Uttarakhand Joshimath).

सलग चार दिवसांपासून हिमवृष्टी सुरु

संबंधित दुर्घटना ज्या भागात घडली त्या भागात गेल्या चार-पाच दिवसांपासून लगातार मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी सुरु आहे. अनेक ठिकाणी रस्ते तुटले आहेत. घटनास्थळापासून अवघ्या काही ठिकाणावर जवानांचे कॅम्प आहेत. जवान रस्ते बनवायचं काम करत आहेत.

मुख्यमंत्र्यांचा हवाई दौरा

दुसरीकडे उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांचंदेखील घटनास्थळाकडे पूर्ण लक्ष आहे. त्यांनी आज हेलिकॉप्टद्वारे घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी सैन्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांना महत्त्वाची सूचनाही दिल्या.

एसडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल

“केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी सुमना येथील हिमस्खलनाच्या घटनेची गंभीरतेने दखल घेतली आहे. त्यांनी या घटनेचा गांभीर्याने विचार करुन उत्तराखंडला पुरेपूर मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यांनी आयटीबीपीला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत”, असं मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी ट्विटरवर सांगितलं आहे. दरम्यान, घटनेची गंभीरता लक्षात घेता घटनास्थळी एसडीआरएफचं पथक रवाना करण्यात आलं आहे, जेणेकरुन बचावकार्याला आणखी गती मिळेल.

हेही वाचा : महाभयंकर! उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला, महापुरामुळे अनेक लोक वाहून गेले, अ‍ॅलर्ट जारी; पाहा व्हिडीओ!

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.