Eknath Khadse : एकनाथ खडसे यांचे कमबॅक होणार; अमित शाह यांची थेट भेट; आता भाजप प्रवेशाचा मुहूर्त कधी?

Eknath Khadse in BJP : तर नाथाभाऊंच्या भाजप प्रवेशाचा अडथळा दूर झाला आहे. एकनाथ खडसे यांचे भाजपमध्ये कमबॅक होणार असल्याचे समजते. त्यांनी काल रात्री रक्षा खडसे यांच्यासह अमित शाह यांची भेट घेतल्याने पक्ष प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे.

Eknath Khadse : एकनाथ खडसे यांचे कमबॅक होणार; अमित शाह यांची थेट भेट; आता भाजप प्रवेशाचा मुहूर्त कधी?
नाथाभाऊंची लवकरच घरवापसी
Follow us
| Updated on: Jun 21, 2024 | 11:46 AM

नाथाभाऊ हे भाजपचे जुने नेते. मध्यंतरी पक्षातील कुरबुरी वाढल्यानंतर त्यांनी वेगळा निर्णय घेतला. पण भाजपचा पिंड त्यांना काही सोडवेना. त्यांनी यापूर्वीच भाजपमध्ये जाणार असल्याचे उघड केले होते. त्यानंतर आता त्यांची घरवापसी जवळपास पक्की समजण्यात येत आहे. नाथाभाऊंच्या भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्रसमोर येत आहे.केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काल रात्री घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे.

भेटीला आले महत्व

काल रात्री केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत आहे. एकनाथ खडसे लवकरच भाजप मधे प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत त्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्व आले आहे. यापूर्वी सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या धबाडग्यात दोन्ही नेत्यांची भेट झाली होती.

हे सुद्धा वाचा

खडसे राष्ट्रवादीत, सून भाजपमध्ये

एकनाथ खडसे हे सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. तर त्यांची सून रक्षा खडसे या भाजपमध्ये आहेत. त्यांनी नुकताच लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला. नाथाभाऊंच्या आशीर्वादाने त्यांनी निवडणुकीत चमकदार कामगिरी केली. त्यांना केंद्रीय राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. त्यानंतर आता या भेटीनंतर खडसे यांचा पक्ष प्रवेश निश्चित मानल्या जात आहे.

नाथाभाऊंची नाराजी झाली कमी

राज्यात विशेषतः खानदेशात भाजपची पाळंमुळं घट्ट करण्यात नाथाभाऊंचा मोठा वाटा आहे. गेल्या 40 वर्षांपासून त्यांनी विविध पदांवर भाजपचे नेतृत्व केले. पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले. पण पक्षातील अंतर्गत कुरबुरु वाढल्या. व्यथित होऊन नाथाभाऊंनी पक्ष सोडला. ते शरद पवार यांच्यासोबत गेले.

खानदेशात भाजपची ताकद वाढेल

शरद पवार यांनी संकटाच्या काळात दिलेली साथ नाथाभाऊ विसरलेले नाहीत. त्यांनी जाहीरपणे त्यांचे मनोगत व्यक्त केले आहे. आपण पवारांचे कायम ऋणी असल्याचे त्यांनी सांगितले आहे. नाथाभाऊ पुन्हा भाजपमध्ये आल्यास खानदेशात पक्षाची ताकद वाढणार आहे. आता त्यांचा पक्ष प्रवेशाचा मुहूर्त कधी लागतो, याकडे त्यांच्या समर्थकांचे, हितचिंतकांचे लक्ष लागले आहे.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.