‘इमेज’ बदलण्यासाठी भाजपची ‘नवी खेळी’ काय?, यूपीच्या निवडणुकीतून वात पेटवणार; विरोधकांना देणार धोबीपछाड

आधी केवळ सवर्णांचा पक्ष असलेल्या भाजपने आपली ही ओळख पुसून बहुजनांपर्यंत भाजपला नेलं. त्यानंतर आता भाजप आपली इमेज आणखी विस्तारणार आहे. (BJP Will Give Tickets To Muslim Candidates In All Five Electoral States In 2022)

'इमेज' बदलण्यासाठी भाजपची 'नवी खेळी' काय?, यूपीच्या निवडणुकीतून वात पेटवणार; विरोधकांना देणार धोबीपछाड
संग्रहित फोटो
Follow us
| Updated on: Aug 22, 2021 | 1:28 PM

नवी दिल्ली: आधी केवळ सवर्णांचा पक्ष असलेल्या भाजपने आपली ही ओळख पुसून बहुजनांपर्यंत भाजपला नेलं. त्यानंतर आता भाजप आपली इमेज आणखी विस्तारणार आहे. भाजप उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत मुस्लिमांना तिकीट देणार आहे. तसेच भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर मुस्लिम मतदारांना प्रवेशही देणार आहे. त्यामुळे विरोधी पक्षाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Election 2022: BJP Will Give Tickets To Muslim Candidates In All Five Electoral States In 2022)

भाजपने संपूर्ण देशात आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचे दिवंगत नेते सिंकदर बख्त यांची येत्या 24 ऑगस्ट रोजी जयंती आहे. त्यानिमित्ताने भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाच्यावतीने श्रद्धांजली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. या निमित्ताने अल्पसंख्याकांना भाजपशी जोडण्याचा प्रयत्नही केला जाणार आहे.

विशेष संदेश द्यायचाय

अल्पसंख्यांकाना भाजपमध्ये आणण्याची मोहीम भाजपकडून राबवली जाणार आहे. त्यानुसार निवडणुका होऊ घातलेल्या उत्तर प्रदेशासहीत पाच राज्यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान 5 हजार मुस्लिम मतदारांना पक्षात समाविष्ट करण्यात येणार आहे. तसेच यावेळी उत्तर प्रदेशात मुस्लिम उमेदवारांना तिकीट देऊन मुस्लिम समाजात विशेष संदेश देण्याचा प्रयत्नही भाजपकडून केला जाणार आहे.

मातब्बर मुस्लिम उमेदवारांना संधी

उत्तर प्रदेशातील विधानसभा मतदारसंघात 70 ते 80 टक्के मुस्लिम मतदार आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी मातब्बर मुस्लिम उमेदवाराला संधी दिली जाईल. तसेच या उमेदवाराला निवडूनही आणलं जाईल. अशा उमेदवारांचा शोध घेतला जात असून त्यांना तिकीट देऊन कामाला सुरुवात करण्याचे निर्देशही दिले जाणार असल्याचं भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चेचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी सांगितलं.

5 हजार मतांवर डोळा

ज्या जागांवर मुस्लिम मतदारांचे कमी मतदान आहे, मात्र, ही संख्या निर्णायक आहे, अशा ठिकाणी मुस्लिम समुदायाची कमीत कमी 5 हजार मते भाजपच्या पारड्यात कशी पडतील यावर भाजप लक्ष केंद्रीत करणार आहे. त्यामुळे मुस्लिम समुदायाला भाजपच्या जवळ आणण्यास मदतच होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट नाही

2017च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने एकाही मुस्लिम व्यक्तीला तिकीट दिलं नव्हतं. त्यामुळे भाजपवर जोरदार टीका झाली होती. त्यावर 2017मध्ये भाजपकडे जिंकून येणारा एकही मुस्लिम उमेदवार नव्हता, त्यामुळे त्यांना संधी नाकारण्यात आल्याचं भाजपचं म्हणणं होतं. मात्र, आता आमच्याकडे जिंकून येण्याची क्षमता असलेले मजबूत उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले जाईल, असं भाजपने स्पष्ट केलं. (Election 2022: BJP Will Give Tickets To Muslim Candidates In All Five Electoral States In 2022)

संबंधित बातम्या:

आपण एक सामर्थ्यवान नेता गमावलाय; कल्याण सिंहांना प्रभू श्रीरामाच्या चरणाशी स्थान मिळो: मोदी

Kalyan singh Passes Away : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

काँग्रेस नेत्यांविरोधातील तपास प्रकरणांमध्ये महत्त्वाची भूमिका; ईडीचा ‘हा’ बडा अधिकारी भाजपच्या वाटेवर?

(Election 2022: BJP Will Give Tickets To Muslim Candidates In All Five Electoral States In 2022)

'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.