Voting : बोगस मतदानाला लवकरच आळा, निवडणूक आयोगाचे महत्वपूर्ण पाऊल, या उपायामुळे मतदानात येईल अधिक पारदर्शकता

Voting : बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाचा हा फंडा रामबाण ठरणार आहे.

Voting : बोगस मतदानाला लवकरच आळा, निवडणूक आयोगाचे महत्वपूर्ण पाऊल, या उपायामुळे मतदानात येईल अधिक पारदर्शकता
जालीम उपायImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 09, 2022 | 7:40 PM

नवी दिल्ली : भारतात निवडणुकांचा उत्सव उत्साहाने साजरा होतो. वर्षातून कोणती ना कोणती निवडणूक होतेच. पण बोगस मतदान (Bogus Voting) ही खरी समस्या आहे. यावर भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) रामबाण उपाय शोधला आहे. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमुळे (EVM) निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्यात काही प्रमाणात यश आले आहे. पण आयोग गैरप्रकारांना 100% लगाम घालण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी आयोगाने कंबर कसली आहे.

निवडणुक आयोगाने मतदार यादीतील बोगस आणि डुप्लिकेट मतदारांचा पत्ता कट करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. अनेकदा असे समोर आले आहे की, एकच व्यक्ती वेगवेगळ्या पत्त्यांवर, विविध शहरात, राज्यात एकाहून अधिक मतदार यादीत नोंदणीकृत असतो.

विविध ठिकाणी नोंदणीचा फायदा घेत हा मतदार विविध ठिकाणी मतदान करतो. त्यामुळे त्याचा सर्वत्र संचार राहतो आणि तो वेगवेगळ्या भागात मतदान करतो. त्याचा परिणाम मतदान प्रक्रियेवर होतो. निवडणूक आयोग आता या बोगस आणि डुप्लिकेट मतदारांना आळा घालणार आहे.

हे सुद्धा वाचा

निवडणूक आयोगाने मतदार यादी शुद्ध करण्याची मोहिम हाती घेतली आहे. त्यासाठी आता निवडणूक ओळखपत्र आधार कार्डशी जोडण्याची मोहिम राबविण्यात येत आहे. देशात आतापर्यंत 56 कोटींहून अधिक मतदार ओळखपत्र (Voter ID) आधार कार्डशी लिंक (Aadhaar Card Link) करण्यात आले आहे.

भारतीय निवडणूक आयोग मतदान यादीतील बोगस मतदारांना आळा घालण्यासाठी व्यापक मोहिम राबविणार आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात त्यासाठी मोहिम राबविण्यात येईल. त्यामुळे एकाच मतदाराचे दोन-तीन ठिकाणी नाव असेल तर ते हुडकून बंद करण्यात येईल.

गेल्या दोन वर्षांपासून निवडणूक आयोगाकडून आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्राशी लिंक करण्याचे काम सुरु आहे. हे लिंक करण्याचे काम सध्या स्वेच्छेने करण्यात येत आहे. त्यासाठी कुठलाही दबाव नाही. अथवा हे काम अनिवार्य करण्यात आलेले नाही.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.