योगींना 72 तास, तर मायवतींना 48 तास प्रचारबंदी, निवडणूक आयोगाची कारवाई
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बहुजन समाज पक्षाचे प्रमुख मायावती यांना ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत केंद्रीय निवडणूक आयोगाने दणका दिला आहे. धार्मिक भावना दुखावल्याचा ठपका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बसपच्या प्रमुख मायावती यांच्यावर ठेवण्यात आला आहे. योगी आदित्यनाथ यांच्यावर काय कारवाई? योगी आदित्यनाथ यांनी आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा ठपका […]
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बहुजन समाज पक्षाचे प्रमुख मायावती यांना ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत केंद्रीय निवडणूक आयोगाने दणका दिला आहे. धार्मिक भावना दुखावल्याचा ठपका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बसपच्या प्रमुख मायावती यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
योगी आदित्यनाथ यांच्यावर काय कारवाई?
योगी आदित्यनाथ यांनी आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा ठपका केंद्रीय निवडणूक आयोगाने ठेवला. योगी आदित्यनाथ यांच्या प्रचार मोहिमेवर उद्या (16 एप्रिल) सकाळी 6 वाजल्यापासून बंदी घालण्यात आली आहे. उद्या सकाळी 6 वाजल्यापासून पुढील 72 तास निवडणूक प्रचार, रोड शो किंवा इंटरव्ह्यू असे निवडणुकीच्या प्रचाराशी संबधित कोणत्याही गोष्टीत योगी आदित्यनाथ सहभागी होऊ शकत नाहीत.
मायावती यांच्यावर काय कारवाई?
दुसरीकडे, मायावती यांच्यावरही आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाचा ठपका ठेवण्यात आला असून, त्यांना उद्या (16 एप्रिल) सकाळी 6 वाजल्यापासून 48 तास रोड शो किंवा इंटरव्ह्यू असे निवडणूक प्रचाराशी संदर्भात गोष्टी करता येणार नाहीत.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान 11 एप्रिल रोजी पार पडलं. दुसरा टप्पा 18 एप्रिल रोजी होणार आहे. तत्पूर्वीच उत्तर प्रदेशातील दोन दिग्गज नेत्यांच्या म्हणजेच योगी आदित्यनाथ आणि मायावती यांच्याविरोधात निवडणूक आयोगाने मोठी कारवाई करत, इतर राजकीय पक्षांनाही इशारा दिला आहे.
काय आहे प्रकरण?
मायावती यांनी 7 एप्रिल रोजी उत्तर प्रदेशातील सहरानपूर येथील देवबंद येथील प्रचारसभेत वादग्रस्त वक्तव्य करुन, आदर्श आचारसंहितेचा भंग केला होता, तर योगी आदित्यनाथ यांनी 9 एप्रिल रोजी मेरठ येथील सभेत वादग्रस्त वक्तव्य करुन आदर्श आचारसंहितेचा भंग केला होता.