Assembly Elections 2022: निवडणूक आयोगाने जाहीर सभांवरील बंदी उठवली, पाच राज्यात निवडणुकीचा जोर वाढणार

निवडणूकीसाठी खुल्या मैदानावर 1000 लोक सहभागी होऊ शकतील असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. तर कार्यालयीन बैठकीत 500 लोक एकत्र येऊ शकतात असेही त्यांनी सांगितले आहे.

Assembly Elections 2022: निवडणूक आयोगाने जाहीर सभांवरील बंदी उठवली, पाच राज्यात निवडणुकीचा जोर वाढणार
election commisioner .
Follow us
| Updated on: Jan 31, 2022 | 5:32 PM

नवी दिल्लीः निवडणूकीसाठी खुल्या मैदानावर 1000 लोक सहभागी होऊ शकतील असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. तर कार्यालयीन बैठकीत 500 लोक एकत्र येऊ शकतात असेही त्यांनी सांगितले आहे. या निर्णयामुळे पाच राज्यातील निवडणुकांच्या घटनांना आता आणखी जोर वाढणार आहे. जाहीर सभांना निवडणूक आयोगानेच मान्यता दिल्याने राजकीय घडामोडींनी वेग येणार आहे. पाच राज्यातील निवडणुकांबाबत निवडणूक आयोगाने त्या त्या राज्यातील निवडणूक अधिकाऱ्यांबरोबर संवाज साधून त्या त्या राज्यातील परिस्थिती जाणून घेतली आहे. जाहीर सभांच्या कार्यक्रमांना निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दिल्याने आता प्रचारही जोरदार होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

पाच राज्यातील येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी मोठ्या गर्दीत सभा होत आहेत, आणि त्या निवडणूक संपेपर्यंत सुरुच राहणार आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने जाहिर सभा घेण्याचे दिवस वाढवले असून काही नियमांमध्येही सूट देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार जाहिर सभांमध्ये आता 1000 हजार लोकं सहभागी होऊ शकणार आहेत. तर कार्यालयीन बैठकींमध्ये 500 लोकांच्या उपस्थितीला मान्यता देण्यात आली आहे. तर जाहीर प्रचारालाही परवानगी देण्यात आली असून 20 लोकं घराघरात जाऊन प्रचार करु शकणार आहेत. पाच राज्यातील निवडणुकांच्या जाहिर प्रचाराबाबत निवडणूक आयोगाची आज ऑनलाईन बैठक झाली त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.

निवडणूक अधिकाऱ्यांबरोबर ऑनलाईन चर्चा

निवडणूक आयोगाच्या या बैठकीला उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर राज्यातील मुख्य निवडणूक आयोगाचे अधिकारी उपस्थित होते. या आधी निवडणूक आयोगाने अशा जाहिर सभांना परवानगी नाकारली होती.

मतदानाचे टप्पे

उत्तर प्रदेशातील 403 जागांसाठी सात टप्प्यांमध्ये मतदान होणार असून 10 फेब्रुवारीपासून मतदानाला सुरुवात होणार आहे. पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान होणार असून 10 फेब्रुवारीला 58 जागांसाठीही पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 14 फेब्रुवारीला 55 जागांसाठी तर तिसऱ्या टप्प्यात 20 फेब्रुवारील 59 जागांसाठी, 23 फेब्रुवारीला चौथ्या टप्प्यात 60 जागांसाठी तर पाचव्या टप्प्यात 27 फेब्रुवारीला 60 जागांसाठी, सहाव्या टप्प्यासाठी 57 तर 3 मार्च रोजी सातव्या टप्प्यासाठी तर 54 जागांसाठी 7 मार्चला मतदान होणार आहे. तर 60 जागांसाठी मणिपूरमध्ये 27 फेब्रुवारी आणि 3 मार्च रोजी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पंजाबमध्ये 20 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून 40 जागांसाठी 14 फेब्रुवारी रोजी गोवा विधानसभेसाठी मतदान होणार आहे.

संबंधित बातम्या

Wine In Maharashtra : मंदिरात पाण्याऐवजी वाईन द्या, डेअरी बंद करा वायनरी काढा-सदाभाऊ खोत

Aurangabad | महापालिका निवडणूक मनसे ताकदीनं लढणार, पदाधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत निर्णय

भाजप राज्यातच काय देशातही सत्तेत येणार नाही, राऊतांपाठोपाठ पटोलेंनी भाजपला डिवचले

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.