Election Commission of India : 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार, निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद

Election Commission of India Live : निवडणूक आयोग आज दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत उत्तर प्रदेश (Uttar Pradesh Election 2022), उत्तराखंड (Uttarakhand), मणिपूर (Manipur), गोवा (Goa) आणि पंजाब (Punjab) या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणार आहे.

Election Commission of India : 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार, निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद
भारतीय निवडणूक आयोग
Follow us
| Updated on: Jan 08, 2022 | 11:46 AM

Election Commission of India Live नवी दिल्ली: निवडणूक आयोग आज दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत उत्तर प्रदेश (Uttar Pradesh Election 2022), उत्तराखंड (Uttarakhand), मणिपूर (Manipur), गोवा (Goa) आणि पंजाब (Punjab) या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आज निवडणुकांच्या तारखांची घोषणा करणार आहे. पाच राज्यातील स्थितीचा आढावा घेतल्यानंतर निवडणूक आयोग अंतिम निर्णयापर्यंत पोहोचल्याची माहिती आहे.

एएनआयचं ट्विट

किती टप्प्यात निवडणूक असणार?

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब, मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशात 8 टप्प्यात निवडणूक घेतली जाईल. तर, पंजाबमध्ये 3 टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडेल. मणिपूरमध्ये 2 टप्प्यात निवडणूक घेतली जाईल. तर, गोवा आणि उत्तराखंडमध्ये एका टप्प्यात निवडणूक घेतली जाईल, अशी माहिती आहे.

2017 च्या विधानसभा निवडणुकांप्रमाणेच यावेळी देखील फेब्रुवारी आणि मार्चच्या पहिल्या टप्प्यात निवडणूक संपू शकते, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आलीय. तर, उत्तर प्रदेश विधानसभेचा कार्यकाळ मे 2022 मध्ये संपणार आहे. तर, उत्तराखंड, गोवा, पंजाब, मणिपूर या राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ मार्च 2022 पर्यंत संपणार आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं संकट?

कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि ओमिक्रॉनची वाढती संख्या या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाला विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा लागणार आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचं संकट असताना निवडणूक जाहीर करत असताना कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन होणार का हे पाहावं लागणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरु असताना होणारी गर्दी, प्रचारसभा या संदर्भात निवडणूक आयोग कठोर नियमावली जाहीर करण्याची शक्यता आहे. कोरोना लस घेतलेल्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केल जाण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या:

आपले मतदार ओळखपत्र हरवले, मग असे करा डाऊनलोड, काही मिनिटांत होणार काम, पाहा प्रक्रिया

Digital Voter ID Card: डिजीटल वोटर कार्ड कसं डाऊनलोड करायचं? वाचा सोप्या टिप्स

Election Commission of India will announce election schedule for Uttar Pradesh Uttarakhand Pujab Goa Manipur assembly today at 3.30 pm via press conference

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....