पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुकांचा बिगूल आज वाजणार; निवडणूक तारखांची घोषणा होण्याची शक्यता

| Updated on: Feb 26, 2021 | 3:41 PM

पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम याच चार राज्यांसह पुद्दुचेरी केंद्रशासित प्रदेशाच्या म्हणजे एकूण पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे बिगूल आज वाजण्याची शक्यता आहे. ((Election Commission to announce election schedule for 5 states at 4:30 PM))

पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुकांचा बिगूल आज वाजणार; निवडणूक तारखांची घोषणा होण्याची शक्यता
पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुकांचा बिगूल आज वाजणार
Follow us on

नवी दिल्ली: पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम याच चार राज्यांसह पुद्दुचेरी केंद्रशासित प्रदेशाच्या म्हणजे एकूण पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे बिगूल आज वाजण्याची शक्यता आहे. मुख्य निवडणूक आयुक्त आज दुपारी 4.30 वाजता या पाचही राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा घोषित करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या राज्यात कधी निवडणुका घेण्यात येणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. संपूर्ण देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही या पाच राज्यात निवडणुका होणार असल्याने आयोगाने त्यावर काय उपाययोजना केली याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Election Commission to announce election schedule for 5 states at 4:30 PM)

पाच वर्षांपूर्वी पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरीत ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणुका झाल्या होत्या. त्यामुळे याता या निवडणुका एप्रिलमध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून काही तासांत त्यावरील सस्पेन्स दूर होणार आहे. या पाचही राज्यात निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याआधीच सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणचे उमेदवारही नक्की करण्यात आले आहेत. फक्त निवडणूक आयोगाने तारखांची घोषणा करताच राजकीय पक्षांकडून उमदेवारांच्या याद्या जाहीर केल्या जाणार आहेत.

विशेष गाईडलाइन

वाढत्या कोरोनाच्या संसर्गात या पाचही राज्यात निवडणुका होत असल्याने निवडणूक आयोगाकडून विशेष गाईडलाइन जाहीर होण्याची शक्यता आहे. मतदारांनी या गाईडलाइनची काटेकोरपालन करावे म्हणून मतदान केंद्रांवर मोठा बंदोबस्तही ठेवला जाण्याची शक्यता आहे.

250 कंपन्या तैनात करणार

केंद्रीय गृहमंत्रालयाने या पाचही विधानसभा निवडणुकांसाठी केंद्रीय रिजर्व्ह पोलीस दल, सीमा सुरक्षा दल, भारत-तिबेट सीमा पोलीस, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि सशस्त्र सीमा दलाच्या एकूण 250 कंपन्या तैनात करण्यात येणार आहेत. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सुमारे 75 कंपन्या तैनात ठेवण्यात येणार आहेत.

एका कंपनीत किती जवान?

सीआरपीएफच्या एका कंपनीत सुमारे 100 जवान असतात. अशा 125 कंपनी पश्चिम बंगालमध्ये पाठवल्या जाणार आहेत. तर तामिळनाडूत 45, आसाममध्ये 40, केरळात 30 आणि पुद्दुचेरीत 10 कंपन्या तैनात करण्यात येणार आहेत. सीआरपीएफच्या कंपनीत 250, सीआरपीएफच्या एका कंपनीत 85, बीएसएफच्या कंपनीत 60 आणि आयटीबीपीच्या कंपनीत 40 जवान असतात. ((Election Commission to announce election schedule for 5 states at 4:30 PM))

एकूण जागा

पश्चिम बंगाल : 294

तमिळनाडू : 234

पुद्दुचेरी : 30

आसाम : 126

केरळ : 140

 

संबंधित बातम्या:   

Assembly Election 2021 Date LIVE : पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार?

पाच राज्यांमध्ये लवकरच निवडणुका, बुधवारच्या बैठकीत ठरणार तारीख, बंगालकडे विशेष लक्ष

‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेत महाराष्ट्र अव्वल, पुणे आणि अहमदनगरने पहिला क्रमांक पटकावला

Gujarat Municipal Election Result : गुजरात महापालिका निवडणुकीत ‘आप’ची दमदार एन्ट्री, 26 फेब्रुवारीला केजरीवालांचा रोड शो

((Election Commission to announce election schedule for 5 states at 4:30 PM))