Loksabha Election Result: लोकसभेत भाजपला झटका, पण या दोन राज्यांतील विधानसभेत चमत्कार, 24 वर्षांचा सत्ता उलथवली
Andhra Pradesh and Odisha assembly Election Results 2024 Lok Sabha Live: भगवान जगन्नाथची भूमी असलेल्या ओडिशामध्ये भाजप सरकार सत्तेवर येत आहे. ओडिशा विधानसभेत १४७ जागा आहेत. त्यापैकी ८० जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे. गेल्या २४ वर्षांपासून सत्तेवर असलेल्या बीजेडीला ५० जागांवर आघाडी मिळवली आहे.
लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला चांगला धक्का बसला आहे. ४००+ ची घोषणा करणाऱ्या भाजपला आता स्वबळावर सत्ता मिळवणे अवघड दिसत आहे. परंतु विधानसभा निवडणुकीत भाजपला जोरदार यश मिळाले आहे. अरुणाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचा निकाल २ जून रोजी आला. त्यात ६० पैकी ४६ जागा भाजपला मिळाल्या. त्यानंतर ४ जून रोजी दोन राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणी झाली. त्यात ओडिशामधील बीजेडीची २४ वर्षांची सत्ता भाजप उलथवून सत्ता मिळवली आहे. तसेच आंध्र प्रदेशात एनडीएचे सरकार सत्तेवर येत आहे.
आंध्र प्रदेशात एनडीए सरकार
आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत चंद्रबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्ष पुन्हा सत्तेत परतणार आहे. आंध्र प्रदेश विधानसभेच्या १७५ जागांमधून १३३ जागांवर आघाडीवर आहे. आता चंद्रबाबू नायडू ९ जून रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. भाजपचे उमेदवार १० ठिकाणी आघाडीवर आहे. आंध्र प्रदेशात भाजप आणि चंद्रबाबू नायडू यांची टीडीपी यांनी एकत्र विधानसभा आणि लोकसभा निवडणूक लढवली होती. सत्तारूढ वायएसआर काँग्रेस केवळ २४ जागांवर आघाडीवर आहे.
ओडिशामध्ये भाजपचा चमत्कार
भगवान जगन्नाथची भूमी असलेल्या ओडिशामध्ये भाजप सरकार सत्तेवर येत आहे. ओडिशा विधानसभेत १४७ जागा आहेत. त्यापैकी ८० जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे. गेल्या २४ वर्षांपासून सत्तेवर असलेल्या बीजेडीला ५० जागांवर आघाडी मिळवली आहे. ओडिशामध्ये बहुमतासाठी ७४ जागा हव्या आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत बीजेडीला ११३ जागा मिळाल्या होत्या. भाजपला केवळ २३ जागांवर विजय मिळवला होता.
अरुणाचल प्रदेशात मिळवली सत्ता
अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल २ जून रोजी आले. अरुणाचल प्रदेशात भाजपला निर्विवाद बहुमत मिळाले. विद्यामान मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ४६ जागांवर विजय मिळवला. २०१९ मध्ये भाजपने ४१ जागा जिंकल्या होत्या. आता त्यात वाढ झाली आहे.