AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विजेच्या खांबातून रस्त्यावर विजेचा करंट, डोळ्यासमोर मुलाचा मृत्यू.. आई किंचाळत राहिली, वडिलांचे प्रयत्न अयशस्वी

मुलाला शॉक बसल्याचे दिसताच आई-वडिलांना काय कळावे हे कळेनासे झाले. वडिलांनी बाजूला पडलेल्या एका बांबूच्या काठीने मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. आईने ओरडत त्याला ओढून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

विजेच्या खांबातून रस्त्यावर विजेचा करंट, डोळ्यासमोर मुलाचा मृत्यू.. आई किंचाळत राहिली, वडिलांचे प्रयत्न अयशस्वी
bihar current deathImage Credit source: social media
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 5:52 PM

मुज्जफरपूर – रस्त्यावर साचलेल्या पाण्यात, विजेच्या खांबातून करंट (Current on road)उतरल्यामुळे, डोळ्यासमोर सख्ख्या मुलाचा मृत्यू (son death) पाहण्याची वेळ आईबापांवर ओढवली. ही दुर्दैवी आणि धक्कादायक घटना मुज्जफरपूरमध्ये घडली आहे. या दुर्घटनेत आई वडिलांचा जीव सुदैवाने वाचला. हे कुटुंब दिल्लीवरुन मुज्जफरपूरला आले होते. त्यांना दरभंग्याला पुढे जायचे होते. मज्जफूपूरला(Muzzafarpur) ते जिथे उतरले तिथून पुढे ते बस स्टँडकडे पायी निघाले होते. रस्त्यात पाणी साचले होते. तरुण मुलगा या पाण्यातून पुढे जात होता, तर आई वडील पाण्याच्या बाजूने जाण्याचा प्रयत्न करत होते. वीजेच्या खांबाजवळ आल्यानंतर पाण्यात या तरुणाला शॉक बसला.

आई वडिलांच्या डोळ्यासमोर तरण्या मुलाचा मृत्यू

मुलाला शॉक बसल्याचे दिसताच आईवडिलांना काय कळावे हे कळेनासे झाले. वडिलांनी बाजूला पडलेल्या एका बांबूच्या काठीने मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. आईने ओरडत त्याला ओढून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. त्याला तिथून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र त्याचा मृत्यू झाला होता. पुढच्या महिन्यात या तरुणाचे लग्न होणार होते.

सरकारी ढिसाळपणाचा बळी

मुज्जफरपूरनगरमध्ये सरकारी कामाच्या ढिसाळपणामुळे या तरुणाचा मृत्यू झाला आहे. स्मार्ट सिटीच्या योजनेंतर्गत स्टेशन रोडसह इतर भागात विकास कामे सुरु करण्यात आली आहेत. रस्त्यावर जिथे पाणी साचले होते, तिथे रस्त्यावरील वीजेची तार तुटून पडली होती. त्यात करंट होता, याकडे दुर्लक्ष झाल्याने तरुणाचा बळी गेला.

हे सुद्धा वाचा

नेमकं काय घडलं.

दरभंग्याला जाण्यासाठी कैलाश यादव, त्यांची पत्नी शुभकला देवी आणि त्यांचा २२ वर्षांचा मुलगा रोहित हमसफर एक्सप्रेसने मुज्जफरनगरला उतरले. बस पकडण्यासाठी बस स्टँडकडे ते निघाले. रस्त्यात पाणी असल्याने ते वेगवेगळे चालू लागले. रोहितने जसाही पाण्यात पराय ठेवला त्याला शॉक बसला आणि तो बाजूला असलेल्या नाल्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी आई धावली, तिलाही शॉक बसला, ती पाण्यात पडली. त्यांना वाचवण्यासाठी कैलाश यादव पुढे सरसावले त्यांनाही शॉक बसला, पण त्यांनी स्वताला सावरलं. त्यांनी पहिल्यांदा पत्नीला वाचवले. त्यानंतर मुलाला रोहितला वाचवले. नंतर त्याला हॉस्पिटलमध्ये मृत घोषित करण्यात आले.

लग्नघरावर शोककळा

रोहितचे पुढच्या महिन्यात लग्न होणार होते, बोलणी सुरु होती. मात्र त्यापूर्वीच त्याचा असा मृत्यू झाल्याने परिवारावर शोककळा पसरली आहे. आईवडील दोघेही हमसून हमसून रडत होते. यादव परिवार दिल्लीत राहणारा आहे. त्यांचा फुलांचा व्यवसाय आहे. मृत रोहित हा ड्रायव्हर होता. सरकारी अनास्थेने एका क्षणात या परिवाराच्या भविष्याचा चुराडा झाला आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग
ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग.
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?.
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं.
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही.
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल.
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं.
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात.
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं.
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल.
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा.