Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi Airport | उड्डाण घेतलेल्या विमानातून धूर, जबलपूरला जाणाऱ्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग, नवी दिल्लीतील घटना

नवी दिल्ली विमानतळावर विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं

Delhi Airport | उड्डाण घेतलेल्या विमानातून धूर, जबलपूरला जाणाऱ्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग, नवी दिल्लीतील घटना
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Jul 02, 2022 | 10:15 AM

नवी दिल्लीः नवी दिल्ली विमानतळावरून (New Delhi Flight) एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे. विमानतळावरून जबलपूरला जाणाऱ्या विमानातून अचानक धूर निघू लागला. प्रवाशांनी वेळीच तक्रार केल्यामुळे विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. दिल्लीतून जबलपूरकडे निघालेल्या स्पाइसजेटच्या प्लाइटमध्ये (Spice jet flight) आग लागल्याचं उघडकीस आलं. याविषयी हाती आलेल्या माहितीनुसार, विमान उड्डाण (Airplane takeoff) घेत होतं तेव्हा काही ठिणग्या उडताना दिसल्या. त्यानंतर संपूर्ण विमानातून विमानातून धूर निघू लागला. पाहता पाहता विमानात धूर झाला. त्यामुळे प्रवासी प्रचंड भयभीत झाले. त्यांनी आरडा-ओरडा केला. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून पायलटने वेळीच निर्णय घेतला आणि विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं.

विमानात आग प्रवासी सुखरूप

याविषयी हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सकाळी दिल्लीहून हे विमान 6.15 वाजता निघते. त्यानंतर 8.30 वाजता ते जबलपूरला पोहोचते. आज सकाळी जबलपुरच्या दिशेने जाण्यासाठी स्पाइस जेटच्या विमानाने उड्डाण घेतलं. मात्र काही मिनिटातच विमानातून ठिणग्या उडू लागल्या. त्यानंतर हळू हळू संपूर्ण विमानातच धूर झाला. हे चित्र पाहून प्रवासी घाबरून गेले. विमानात एकच गोंधळ उडाला. विमान लवकरात लवकर जमिनीवर घेण्याची विनंती करू लागले. विमानात झालेला हा बिघाड पाहून पायलटने वेळीच योग्य निर्मय घेतला. विमान पुन्हा दिल्ली विमानतळावर उतरण्याची परवानगी घेतली. विमानाचे एअरपोर्टवर सुरक्षित इमर्जन्सी लँडिंग केले. त्यानंतर सगळ्या प्रवाशांना सुखरूप बारे काढण्यात आले.

घटनेमागील कारण नेमकं काय?

जबलपूरला जाणाऱ्या या विमानाला सुखरूप दिल्ली विमानतळावरच उतरवण्यात आलं. त्यातून प्रवाशांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आलं. दिल्ली विमानतळावर घडलेल्या या घटनेचं हे प्राथमिक वृत्त आहे. अद्याप स्पाइस जेटतर्फे सदर घटना नेमकी का घडली, यामागील स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.