असा क्षण जो भारतीय कधीच विसरू शकणार नाही… तुम्हाला सॅल्यूट करतो… इस्रोच्या शास्त्रज्ञांना भेटताच मोदी भावूक

तुम्ही जो ठरवता ते करून दाखवता हे तुम्ही दाखवून दिलं आहे. देशातील जनतेचा तुमच्यावर विश्वास आहे. विश्वास कमावणे ही सोपी गोष्ट नाही. देशातील जनतेचा आशीर्वाद आहे. त्यामुळेच भारत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर ग्लोबल लीडर बनेल.

असा क्षण जो भारतीय कधीच विसरू शकणार नाही... तुम्हाला सॅल्यूट करतो... इस्रोच्या शास्त्रज्ञांना भेटताच मोदी भावूक
PM Narendra ModiImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 26, 2023 | 9:41 AM

बंगळुरू | 26 ऑगस्ट 2023 : ब्रिक्स संमेलन आणि ग्रीसचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थेट बंगळुरूत आले. विमानतळावरून मोदी यांनी इस्रो कमांड सेंटर गाठलं. यावेळी त्यांनी शास्त्रज्ञांची भेट घेतली. त्यांचं अभिनंदन केलं. त्यांच्याशी चर्चा केली. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांची गळाभेट घेतली. त्यानंतर मोदी यांनी या शास्त्रज्ञांना संबोधित करण्यास सुरुवात केली. यावेळी मोदी भावूक झाले. त्यांचे डोळे भरून आले. तुमच्या कर्तबागारी आणि यशाचं वर्णन करायला माझ्याकडे शब्द नाहीत. मी तुम्हाला सॅल्यूट करतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्यावेळी त्यांचे डोळे भरून आले होते. मोदी यांना भावूक झालेलं पाहून इस्रोचे शास्त्रज्ञही हेलावून गेले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून इस्रोच्या शास्त्रज्ञांवर कौतुकाचा वर्षाव केला. तुमच्यामध्ये आल्याने मला आनंद होतोय. असा आनंद अपवादानेच मिळतो. आज माझं तन मन आनंदाने भरून गेलं आहे. इस्रो कमांड सेंटर येण्यासाठी मी अत्यंत उत्सुक झालो होतो. भारतात येताच तुमचं लवकरात लवकर दर्शन घ्यावं ही इच्छा होती. त्यामुळे मी ग्रीसवरून येताच थेट तुमच्या दर्शनासाठी आलो आहे. मी तुम्हाला सॅल्यूयट करतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

प्रत्येकाला वाटतं माझंच यश

भारताच्या यशानंतर आज जगभरात भारताचाच डंका वाजत आहे. हे साधारण यश नाहीये. जे आपण केलं ते पूर्वी कधीच कोणी केलं नव्हतं. जेव्हा टच डाऊन कन्फर्म झालं तेव्हा देशातील लोक हर्षोल्हासित झाले. हे माझंच यश आहे, असं प्रत्येक भारतीयाला वाटू लागलं. आज शुभेच्छा दिल्या जात आहे. आपल्या देशातील शास्त्रज्ञांनी ही गोष्ट शक्य केली. आज तुमचं जेवढं गुणगान गावं, तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, असंही मोदी म्हणाले. हे सांगताना मोदी भावूक झाले होते.

हा अंतराळातील शंखनाद

तुम्ही देशाला ज्या उंचीवर घेऊन गेला आहात. ते साधारण यश नाहीये. अनंत अंतराळात भारताच्या वैज्ञानिक समार्थ्याचा हा शंखनाद आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी आपलं यान उतरलं, त्या ठिकाणाला शिवशक्ती हे नाव देण्यात येत असल्याची मी घोषणा करतो. तेच आपला चंद्रयान -2 ज्या ठिकाणी चंद्रावर पोहोचलं होतं त्याला तिरंगा हे नाव देण्यात येणार आहे. त्याशिवाय ज्या 23 तारखेला आपण चंद्रावर पोहोचलो, तो दिवस नॅशनल स्पेस डे म्हणून साजरा करण्यात येणार असल्याचं मी जाहीर करत आहे, असं मोदी यांनी जाहीर केलं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.