कर्मचारी मोजून मोजून थकले, 11 दिवसात राम मंदिरात आले कितक्या कोटींचे दान

Ram mandir : राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून दररोज लाखो लोकं अयोध्येला येत आहेत. आतापर्यंत २८ लाख लोकांनी रामलल्लाचे दर्शन घेतले असून करोडो रुपये दान केले आहेत. रोख आणि ऑनलाईन पद्धतीने लोकं मंदिरात दान करत आहेत. आतापर्यंत किती देणगी आली आहे जाणून घ्या.

कर्मचारी मोजून मोजून थकले, 11 दिवसात राम मंदिरात आले कितक्या कोटींचे दान
Follow us
| Updated on: Feb 05, 2024 | 5:38 PM

Ayodhya : अयोध्येत रामलल्ल विराजमान झाल्यानंतर राम मंदिरात दररोज लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी दाखल होत आहेत. देशभरातूनच नाही तर जगभरातून रामभक्त अयोध्येत येत आहेत. रामललाचे दर्शन घेऊन ते रामलल्लाला मनापासून दानही करत आहेत. राम मंदिर ट्रस्टचे सदस्य डॉ.अनिल मिश्रा यांनी सांगितले की,  दररोज तीन लाख लोक मंदिरात दर्शनासाठी येत आहेत. २२ जानेवारी ते ३ फेब्रुवारीपर्यंत दर्शनासाठी आलेल्या रामभक्तांची संख्या २८ लाखांच्या पुढे गेली आहे. इतकंच नाही तर रामल्लासाठी भाविकांनी मोठ्या मनाने दान देखील दिले आहे. दररोज मोठ्या देणग्या दानाच्या रुपात येत आहेत. रामभक्त रोख आणि धनादेशाद्वारे दान करत आहेत. राम मंदिर ट्रस्टकडून भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जात आहे.

लाखो लोकांकडून दान

रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी तासनतास भाविक रांगेत उभे राहत आहेत. अयोध्येत रामलल्ला विराजमान झाल्यानंतर गेल्या 11 दिवसांत 20 कोटी रुपयांची देणगी भक्तांकडून आली आहे. केवळ रोख रकमेतूनच नाही तर मौल्यवान वस्तू देखील दान केले जात आहेत. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कार्यालय प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी सांगितले की, प्रभू राम विराजमान झाल्यापासून सुमारे २८ लाख राम भक्तांनी मंदिरात दर्शन घेतले असून 20 कोटींहून अधिक रक्कम दान म्हणून आली आहे.

दिवसातून दोनदा रिकामी कराव्या लागतात दानपेटी

रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर  मंदिरात चार ठिकाणी मोठ्या मोठ्या दानपेटी ठेवण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये भक्त दान करत आहेत. इतकंच नाही तर दिवसातून किमान दोन वेळा या दानपेट्या रिकामी कराव्या लागत आहेत. मंदिरात येणारी देणगी मोजण्यासाठी बँकेचे 11 कर्मचारी आणि मंदिर ट्रस्टचे 3 कर्मचारी ठेवण्यात आले आहे. दररोज ही रक्कम मंदिरात जमा केली जाते. स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी आणि ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्या देखरेखेखाली रक्कम मोजली जात आहे. संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली होत आहे. 22 जानेवारीलाच राम मंदिरात 3.17 कोटी रुपयांची देणगी मिळाली होती.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.