Marathi News National Enforcement Directorate has filed a chargesheet against Karnataka Congress president DK Shivakumar and others in an alleged money laundering case
ED Action on DK Shivakumar: काँग्रेसमध्ये पडझड सुरू असतानाच EDची कर्नाटकात मोठी कारवाई; अध्यक्ष डीके शिवकुमार यांच्यावर आरोपपत्र दाखल
अंमलबजावणी संचालनालयाने (ED) शिवकुमार आणि इतरांविरुद्ध कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोपपत्र दाखल केले आहे. आयकर विभागाने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे ईडीने नोंदवलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात शिवकुमार सध्या जामिनावर बाहेर आहेत.
कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमारImage Credit source: tv9
बंगळूरू : काँग्रेसमध्ये (Congress)पडझड सुरू अनेक दिग्गज काँग्रेसचा साथ सोडत आहे. त्यातच आता कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार (DK Sivakumar)यांच्यावर लवकरच कडक कारवाई होऊ शकते. अंमलबजावणी संचालनालयाने (ED)कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात शिवकुमार आणि इतरांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. आयकर विभागाने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे ईडीने दाखल केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात शिवकुमार सध्या जामिनावर बाहेर आहेत. तपास एजन्सीचा दावा आहे की शिवकुमार यांच्या 800 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा कोणताही हिशेब नाही, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्याचवेळी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर डीके शिवकुमार म्हणाले की, माझा कायद्यावर विश्वास आहे. मला माहित आहे की मला न्याय मिळेल. या सर्व कारवाया राजकीय हेतूने केल्या जात आहेत. तर या प्रकरणात शिवकुमार सध्या जामिनावर बाहेर आहेत.
Enforcement Directorate has filed a chargesheet against Karnataka Congress president DK Shivakumar and others in an alleged money laundering case.
फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने सप्टेंबर 2018 मध्ये शिवकुमार, ए हौमंथैया, नवी दिल्लीतील कर्नाटक भवनचे कर्मचारी आणि इतरांविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवला होता. हा खटला आयकर विभागाने शिवकुमार आणि इतरांविरुद्ध दिल्ली न्यायालयात कथित करचोरी आणि हवाला व्यवहारांसाठी दाखल केलेल्या आरोपपत्रावर आधारित होता. तर हा खटला आयकर विभागाने शिवकुमार आणि इतरांविरुद्ध बंगळुरू न्यायालयात कथित करचोरी आणि हवाला व्यवहारांसाठी दाखल केलेल्या आरोपपत्रावर आधारित होता.
आरोप काय आहे?
आयकर विभागाने शिवकुमार आणि त्यांचे सहकारी एसके शर्मा यांच्यावर तीन अन्य आरोपींच्या मदतीने हवाला चॅनेलद्वारे नियमितपणे मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रक्कम इकडे-तिकडे केल्याचा आरोप केला आहे. 60 वर्षीय शिवकुमार यांना 2019 मध्ये ईडीने या प्रकरणात अटक केली होती. तर त्यावेळी एजन्सीने त्यांची मुलगी ऐश्वर्या आणि काँग्रेस आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह अनेक लोक आणि सहयोगींची चौकशी केली होती. या प्रकरणात शिवकुमार सध्या जामिनावर बाहेर आहेत.