EPFO Pension : वाढीव पेन्शनसंदर्भात ईपीएफओचा महत्वाचा निर्णय, जाणून घ्या काय आहे नवीन बदल
Higher Pension Deadline : कर्मचाऱ्यांसाठी अधिक पेन्शन योजनेची मुदत आता पुन्हा वाढवण्यात आली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना अधिक पेन्शन योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. यापूर्वी दोन वेळा यासाठी मुदत देण्यात आली होती.
नवी दिल्ली : जर तुम्हाला अधिक पेन्शन हवे असल्यास आता त्यासाठी एक योजना (Pension Scheme) आली होती. त्या योजनेत अर्ज करण्याची मुदत ३ मे २०२३ रोजी संपणार होती. परंतु त्यास मुदतवाढ मिळाली आहे. जे कर्मचारी 1 सप्टेंबर 2014 पूर्वी किंवा 1 सप्टेंबर 2014 नंतर ईपीएफचे सदस्य होते, परंतु त्यांनी हायर पेन्शनसाठी अर्ज केला नव्हता, त्यांच्यांसाठी अर्ज करण्याची मुदत ३ मे पर्यंत होती. परंतु आता पुन्हा ती वाढवण्यात आली आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला होता. त्यानुसार कर्मचाऱ्यांना वाढीव पेन्शन योजनेसाठी अर्ज करता येत आहे.
१२ लाख लोकांचे अर्ज
आतापर्यंत वाढीव पेन्शन योजनेसाठी १२ लाखांहून अधिक अर्ज करण्यात आले आहेत. यापूर्वी ऑनलाइन सुविधा ३ मे २०२३ पर्यंतच होती. आता त्याची मुदत वाढवून २६ जून २०२३ पर्यंत करण्यात आली आहे. यामुळे पात्र कर्मचारी आता अधिक निवृत्ती वेतन मिळविण्यासाठी २६ जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करू शकतील.
वाढीव पेन्शन पण पगारावर परिणाम नाही
EPS मध्ये, कर्मचारी स्वतःच्या वतीने कोणतेही योगदान देत नाही. कंपनीने केलेल्या एकूण 12 टक्के योगदानापैकी केवळ 8.33 टक्के योगदान EPS मध्ये जाते. पेन्शनपात्र पगाराची मर्यादा 15 हजार असल्याने, यामुळे ईपीएसचे योगदानही 1,250 रुपयांपर्यंत मर्यादित होते. कंपनीच्या योगदानात यापेक्षा कितीही जास्त रक्कम असेल तर ती ईपीएफमध्ये जाते. आता EPS मध्ये वाढलेले योगदान देखील कंपनीच्या हिश्श्याचे असणार आहे. यामुळे जास्त पेन्शनचा पर्याय निवडला तरीही टेक होम सॅलरी किंवा इन हॅन्ड सॅलरीवर कोणताही परिणाम होणार नाही.
सदस्य वाढले
कामगार मंत्रालयानुसार, डिसेंबर 2021 पेक्षा डिसेंबर, 2022 मध्ये ईपीएफओ सदस्यांची संख्या 32,635 हून अधिक वाढली आहे. या तुलनेनुसार, देशात रोजगाराच्या संधी वाढत असल्याचे सूचित होते. कामगार मंत्रालयानुसार, कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ESIC) आकड्यानुसार, डिसेंबर 2022 मध्ये ईएसआयसीसोबत नवीन 18.03 लाख कर्मचारी जोडल्या गेले आहेत.
मनी9 च्या अहवालानुसार, जर तुम्ही आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक केले नाही तर पीएफ वा ईपीएफमधून रक्कम काढताना अडचण येईल. तुम्ही पाच वर्षांपूर्वीच या खात्यातून रक्कम काढणार असाल तर तुम्हाला पीएफ विथड्रावलवर कर द्यावा लागेल.