वडिलांच्या प्रॉपर्टीत मुलीच्या मृत्यूनंतर जावई, नातवांचाही हक्क! दिल्ली कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

Delhi Court on after daughter death Property Claim : मामानं भाच्याला मालमत्तेमध्ये हिस्सा न दिल्यात हे प्रकरण कोर्टापर्यंत गेलं. वडिलांच्या संपत्तीत आईचा हिस्सा होता. एक तृतीयांश भागावर हक्क असलेल्या आईच्या मृत्यूनंतर आता काय करायंच? असा प्रश्न याचिकाकर्त्यांना पडला होता.

वडिलांच्या प्रॉपर्टीत मुलीच्या मृत्यूनंतर जावई, नातवांचाही हक्क! दिल्ली कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
मुलीच्या मृत्यूनंतर माहेरच्या प्रॉपर्टीवर हक्क सांगता येतो?Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 01, 2022 | 8:18 PM

दिल्ली : दिल्ली कोर्टानं (Delhi Court) महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. दिल्ली कोर्टानं दिलेल्या या निकालानं प्रॉपर्टीच्या मुद्द्यावरुन सुरु असलेल्या अनेक वादांना नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. दिलेल्या कोर्टानं दिलेल्या निर्णयानुसार आता मृत्यू झालेल्या मुलीच्या नवऱ्याला आणि मुलांना आपल्या वडिलांच्या प्रॉपर्टीत (Son in law has rights to claim property of his father in law after death of his wife) हिस्सा मिळू शकणार आहे. मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांच्या संपत्तीवर जावई आणि नातवंडांचाही हक्क कायम असेल, असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. दिल्ली कोर्टानं दिलेला ऐतिहासिक निर्णय (Historic Decision) मानला जातो आहे. गुरुवारी (31 मार्च) रोजी या प्रकरणी दिल्लीत सुनावणी पार पडली. याप्रकरणी महत्त्वपूर्ण टिप्पणी करताना आता दिल्ली न्यायलयानं प्रॉपर्टीच्या विक्रीचा अधिकार दुसऱ्या पक्षाला देण्याचं स्थगिती दिली आहे.

सविस्तर प्रकरण!

गुरुवारी दिल्ली न्यायालयात मालमत्तेच्या एका प्रकरणावर सुनावणी सुरु होती. एका मुलानं आपल्या मृत्यू झालेल्या आईच्या वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क सांगितला होता. यावर न्यायालयानं महत्त्वाची टिप्पणी देताना ऐतिहासिक निकाल दिला आहे. आजोबांच्या मालमत्तेवर मुलाच्या मामानं हक्क न दिल्याच्या कारणावरुन न्यायलयात एकानं दाद मागितली होती. दरम्यान, कोर्टानं याप्रकरणी या मुलाला दिलासा दिलाय. नरेश कुमार लाकर यांच्या न्यायालयात याप्रकरणी सुनावणी झाली.

कोर्टानं काय म्हटलंय?

मुलीचा मृत्यू झालेला असल्यास मुलीच्या वडिलांच्या मालमत्तेवर तिच्या नवऱअयाचा आणि नातवांचाही हक्क असेल, असं कोर्टानं स्पष्टपणे नमूद केलं आहे. जोपर्यंत मालमत्तेसह हिस्सा निश्तिच होत नाही, तोपर्यंत मालमत्ता विकण्याचा अधिकारही नसेल, असंही कोर्टानं स्पष्ट केलं आहे.

कोर्टात का गेलं प्रकरण?

मामानं भाच्याला मालमत्तेमध्ये हिस्सा न दिल्यात हे प्रकरण कोर्टापर्यंत गेलं. वडिलांच्या संपत्तीत आईचा हिस्सा होता. एक तृतीयांश भागावर हक्क असलेल्या आईच्या मृत्यूनंतर आता काय करायंच? असा प्रश्न याचिकाकर्त्यांना पडला होता. अखेर त्यांनी मामानं मालमत्तेत हिस्सा दिल्यानं कोर्टात धाव घेतली. आता कोर्टानं याप्रकरणी दिलासा देत मृत्यू झाल्यानंतरही मुलीच्या नवऱ्याचा आणि मुलांचा माहेरशी असलेला व्यावहारीक संबंध अधोरेखित केला आहे. तसंच याप्रकरणी आता संपूर्ण मालमत्तेचं मूल्यांकन करण्याचे निर्देशही जारी करण्यात आले आहेत. तोपर्यंत या मालमत्तेची विक्री करता येणार नाही, असंही कोर्टानं ठणकावलं आहे.

संबंधित बातम्या :

वडिलांच्या संपत्तीवर मुलींचा किती हक्क? ‘या’ आहेत 10 महत्त्वाच्या कायदेशीर तरतुदी

माहेर बाई हक्काचं! 1956 पूर्वीच्या मालमत्तेतही मुलीचा वारसा हक्क मान्य, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण विकाल

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.