आजपण सर्व पर्याय खुले, भारताने पाकिस्तानला थेट इशाऱ्यात पाहा काय म्हटलंय
India warn pakistan : भारताने पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यावर कडक शब्दात इशारा दिला आहे. पाकिस्तानच्या समर्थनाशिवाय घुसखोरी होऊ शकत नाही. पाकिस्तानच्या आर्मीचा ही यात सहभाग असल्याचं याआधीही समोर आलं आहे. यावर भारताने पाकिस्तानला खडसावलं आहे.
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तान पुरस्कृत घुसखोरीवर आता मोदी सरकारने कडक शब्दात इशारा दिला आहे. सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानातून होणारी घुसखोरीची थांबली नाही तर भारतापुढे कारवाईसाठी सर्व पर्याय खुले असल्याचं भारताने ठणकावून सांगितलं आहे.
भारतीय सीमा भागातून घुसखोरी ही पाकिस्तानी सैन्याच्या समर्थनाशिवाय होऊ शकत नाही. एलओसीच्या त्या बाजुला दहशवताद्यांचे प्रशिक्षण शिबीरे चालवली जातात. त्यानंतर भारतात हल्ले करण्याचा कट रचला जातो. सीज फायर करुन दहशतवाद्यांना भारतीय सीमेतून घुसखोरी करण्यासाठी मदत केली जाते. अशा शब्दात भारताने पाकिस्तानला ठणकावलं आहे.
भारतपुढे आपल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी तात्काळ प्रभावाने युद्धविराम संपवण्याचा पर्याय आहे. असं देखील भारताने कानउघडणी केली आहे. आमच्याकडे दुसरा पर्याय देखील आहे. दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त करु शकतो. तिसरा पर्याय म्हणजे पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आणि गिलगिट-बाल्टिस्तान प्रदेशात राहणारे लोकं भारतात विलीनीकरणाची मागणी करत आहेत आणि अशा स्थितीत त्यांच्या आवाजाला पाठिंबा देऊ शकतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार हे कोणतीही कारवाई करण्यासाठी तयार आहे. कोणतेही कठोर पाऊल उचलण्यासाठी मागे बघितले जाणार नाही. उचलण्याच्या स्थितीत आहेत. कोणताही पर्याय नाकारता येत नाही आणि राजकीय नेतृत्वाला खात्री पटली की आम्ही कशासाठीही तयार आहोत, असे ते म्हणाले.