Exit Poll Results: जम्मूमध्ये भाजपची आघाडी, पण काश्मीरने फसवला पेच, कोण गाठणार बहुमत?

Jammu Kashmir Exit Poll 2024 : आता हरियाणामधील मतदान संपताच एक्झीट पोलचे निष्कर्ष आले आहे. त्यात जम्मूमध्ये भाजपची आघाडी आहे. परंतु काश्मीरमध्ये भाजपचा सफाया आहे. यामुळे काँग्रेस आणि नॅशनल क्रॉन्फ्रन्स सर्वात मोठा पक्ष ठरत असल्याचे एक्झीट पोलमध्ये म्हटले आहे.

Exit Poll Results: जम्मूमध्ये भाजपची आघाडी, पण काश्मीरने फसवला पेच, कोण गाठणार बहुमत?
Jammu and Kashmir Election Exit Poll
Follow us
| Updated on: Oct 05, 2024 | 7:58 PM

Jammu and Kashmir Election Exit Poll Results : जम्मू-कश्मीरमधील 90 विधानसभा जागांसाठी तीन टप्प्यात मतदान झाले होते. 18, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोंबर रोजी मतदान झाले होते. 8 ऑक्टोंबर रोजी मतमोजणी होणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेसची युती होती. परंतु महबूबा मुक्ती यांची पीडीपी आणि भाजप स्वबळावर रिंगणात उतरले होते. इंजिनिअर राशिदची आवामी इत्तेहाद पार्टीची चर्चा निवडणुकीत होती. आता हरियाणामधील मतदान संपताच एक्झीट पोलचे निष्कर्ष आले आहे. त्यात जम्मूमध्ये भाजपची आघाडी आहे. परंतु काश्मीरमध्ये भाजपचा सफाया आहे. यामुळे काँग्रेस आणि नॅशनल क्रॉन्फ्रन्स सर्वात मोठा पक्ष ठरत असल्याचे एक्झीट पोलमध्ये म्हटले आहे.

आजतक अन् सी-व्होटरचा एक्झीट पोल

कश्मीर घाटीतील 47 जागांपैकी नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेसच्या युतीला 29-33 जागा मिळण्याचा अंदाज आजतकच्या एक्झीट पोलमध्ये आहे. काश्मीरमध्ये भाजपला केवळ 0-1 जागा मिळणार आहे. पीडीपी 6-10 तर इतरांच्या खात्यात 6 ते 10 जागा जाणार आहे. आजतक आणि सी-व्होटरचा एग्झिट पोलनुसार जम्मूच्या 43 जागांपैकी नॅशनल कॉन्फ्रेन्स आणि काँग्रेसला 11-15 जागा मिळतील. पण भाजप 27-31 जागांवर आघाडी घेणार आहेत. पीडीपी 0-2 जागा जिंकण्याची शक्यता आहे.

18 जागांवर अटीतटीची लढत

आजतक आणि सी-व्होटरच्या एक्झिट पोलनुसार, जम्मू आणि काश्मीरमधील विधानसभेच्या 90 जागांपैकी 18 जागांवर अटीतटीची लढत आहे. यामध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीमध्ये 10 जागांवर चुरशीची लढत आहे. तर भाजप 3 जागांवर तर पीडीपी 4 जागांवर लढत आहे.

पीडीपी किंगमेकर ठरणार का?

एनसी आणि काँग्रेसला बहुमत मिळत असल्याचे काही एक्झिट पोलमध्ये स्पष्ट झाले आहे. पण हा पोल पाहता जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापनेत पीडीपी आणि इतर पक्षांची भूमिकाही महत्त्वाची ठरू शकते. दरम्यान, पीडीपीचे प्रवक्ते शेख नसीर यांनी मोठा दावा केला असून आमच्याशिवाय कोणतेही सरकार स्थापन होणार नाही.

कोणाच्या एक्झीटपोलमध्ये कोणास किती जागा

एक्झीट पोल आज तक भास्कर मॅट्रिझ पीपल प्लस
भाजप 27-32 20-25 28-30 23-27
काँग्रेस 40-48 35-40 28-30 46-50
पीडीपी 6-12 4-7 5-7 7-11
इतर 6-11 12-16 8-16 4-6
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.