Explosion in Kabul : काबूलच्या मशिदीत स्फोट, 20 भाविक ठार, 50 पेक्षा जास्त जखमी

अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये स्फोट झाला. या स्फोटात 20 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालाय. 50 पेक्षा जास्त जण ठार झालेत. मर्गारेबच्या नमाजदरम्यान हा स्फोट झाला. मृतकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

Explosion in Kabul : काबूलच्या मशिदीत स्फोट, 20 भाविक ठार, 50 पेक्षा जास्त जखमी
काबूलच्या मशिदीत स्फोट, 20 भाविक ठार
Follow us
| Updated on: Aug 17, 2022 | 11:37 PM

काबूल : अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये स्फोट झाला. या स्फोटात 20 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालाय. 50 पेक्षा जास्त जण ठार झालेत. मर्गारेबच्या नमाजदरम्यान हा स्फोट झाला. मृतकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. काबूलच्या मशिदीत स्फोट झाल्याचं अफगाणी माध्यमांनी सांगितलंय. यात 20 पेक्षा जास्त भाविकांचा मृत्यू झालाय. तर 50 पेक्षा जास्त भाविक जखमी असल्याची माहिती आहे. अफगाणमधील खैरखाने जिल्ह्यात बुधवारी संध्याकाळी हा स्फोट झाला. अबुबाकीर सेदीक मशिदीत हा स्फोट झालाय. तालिबानी सुरक्षा अधिकाऱ्यांनी (security officers) अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. स्फोटाची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणा सज्ज झाल्यात. पोलिसांचा ताफा (police convoy) घटनास्थळी रवाना झाला.

स्फोटात मौलवी अमीर मुहम्मद ठार

या स्फोटात विद्वान मौलवी अमीर मुहम्मद काबुली यांचा मृत्यू झाला. अफगाणमध्ये अशाप्रकारचा स्फोट गेल्या महिन्यात झाला होता. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. स्फोटाची जबाबदारी दहशतवादी संघटना आयएसआयएसनं घेतली. इस्लामिक स्टेटने हा स्फोट म्हणजे पैगंबर यांच्या समर्थनात केलेलं कार्य म्हटलं आहे. बेवसाईट अमाकवरील पोस्टमध्ये म्हटलं की, इस्लामिक स्टेट-खुरासान प्रोव्हिन्सनं म्हटलंय की, हा हल्ला म्हणजे हिंदू, सिख आणि धर्मभ्रष्ट लोकांच्या विरोधात आहे ज्यांनी अल्लाहच्या दुताचा अपमान केला.

सुरक्षा दलाने तीन हल्लेखोरांचा केला खात्मा

आतंकवादी समूहाने म्हटलं की, एका सुरक्षा गार्डाच्या हत्तेनंतर हल्लेखोर हिंदू आणि सिखांच्या मंदिरात शिरला. आतमध्ये असलेल्या भाविकांवर मशीनगनने गोळीबार केला. हातगोळे फेकले. अफगाण सुरक्षा रक्षकांनी विस्फोटकानं भरलेल्या ट्रकला गुरुद्वारा परिसरात जाण्यापासून रोखले. गुरुद्वारावरही हल्ला होणार होता. तेवढ्यात तालिबानी सुरक्षा रक्षकांनी तीन हल्लेखोरांना ठार केलं.

नमाज पडताना झाला स्फोट

अफगाणिस्तानची राजधानी काबूल बुधवारी स्फोटानं हादरली. या स्फोटात मशिदीतील भाविक ठार झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे नमाजादरम्यान हा स्फोट झाला. 20 पेक्षा जास्त भाविकांचा स्फोटात मृत्यू झाला. शिवाय 50 पेक्षा जास्त भाविक ठार झाल्याची माहिती आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.