स्कूटरवरुन फटाके घेऊन जात असताना स्फोट, एकाचा मृत्यू तर अनेक जण जखमी
दिवाळीत फटाके वाजवण्यासाठी अनेक लोकं उत्साही असतात. पण अनेकदा योग्य काळजी न घेतल्याने फटाक्यांमुळे लोकांना गंभीर इजा देखील होते. अशीच एक घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याने स्पष्ट होऊ शकली.
अमरावती : दिवाळीत फटाके फोडताना नेहमीच काळजी घेण्याचा आवाहन केलं जातं. दिवाळीत अनेकदचा फटाक्यांमुळे आनंदाचं दुखात रुपांतर होतं. आंध्र प्रदेशातील एलुरुमध्ये देखील एक अशीच घटना घडली आहे. फटाक्यांच्या पिशवीत स्फोट झाल्याने एकाचा मृत्यू झालाय, तर सहा जण जखमी झाले आहेत. घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ जेव्हा समोर आला तेव्हा हे संपूर्ण प्रकरण लक्षात आलं. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. फटाक्यांच्या स्फोटात रस्त्यावर उभे असलेले काही लोकंही गंभीर जखमी झाले.
रस्त्यावर उभ्या असलेल्या काही लोकांजवळून एक स्कूटर जात असताना फटाक्यांच्या पिशवीत अचानक स्फोट झाला. स्कूटर लोकांच्या जवळून जात असताना ही घटना घडली. हे लोक रस्त्याच्या एका बाजूला उभे राहून बोलत होते.
सीसीटीव्हीत कैद झालेल्या घटनेनुसार हा स्फोट दिवाळीच्या फटाक्यांमुळे झाल्याचे समोर आले आहे. स्कूटरवर बसलेल्या तरुणाच्या हातात फटाक्यांची पिशवी होती. रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांजवळून स्कूटर जात असतानाच स्फोट झाला.
Diwali crackers exploded in Eluru of AP when the bike hits a pothole – be careful guys #dwiali #deepavali pic.twitter.com/oOHv2YQnid
— Lokesh journo (@Lokeshpaila) October 31, 2024
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत स्कूटरवर बसलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना आधी स्पष्ट होत नव्हती. परंतू सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर दिवाळीचे फटाके फुटल्याने हा स्फोट झाल्याचे समोर आलंय. पोलिसांनी घटनेची दखल घेतली आहे.