Ind vs Pak : इथे पाकिस्तानकडून पीएम मोदींना SCO साठी निमंत्रण, तिथे जयशंकर यांनी फायनल काय ते सांगितलं
India-Pakistan Relation : पाकिस्तानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना SCO सम्मेलनात सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिलय. दुसऱ्याबाजूला परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानबद्दलची भूमिका एकदम स्पष्टपणे सांगितली आहे. भारत-पाकिस्तानचे संबंध भविष्यात कसे असतील? याचं उत्तर त्यात आहे.
पाकिस्तानात 15-16 ऑक्टोबरला SCO सम्मेलन होणार आहे. पाकिस्तान यजमान आहे. इस्लामाबादमध्ये हे सम्मेलन होईल. त्यात सहभागी होण्यासाठी पाकिस्तान सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण पाठवलं आहे. दुसऱ्याबाजूला एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला काही गोष्टी सरळ सुनावल्या आहेत. पाकिस्तानसोबत चर्चा करण्याच युग आता समाप्त झालय. राजधानी दिल्लीत एका पुस्तक प्रकाशन समारंभात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी हे विधान केलं.
“प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. जम्मू-काश्मीरचा विषय असेल, तर तिथे आता अनुच्छेद 370 समाप्त झालाय. त्यामुळे मुद्दाच संपलाय. आता पाकिस्तान सोबत कसं नातं हवं हा विचार का करायचा?” असं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना विचारण्यात आलं, भारत पाकिस्तानमध्ये कशा प्रकारचे संबंध असतील? त्यावर जयशंकर म्हणाले की, “मला जे म्हणायचय ते एकदम स्पष्ट आहे. आम्ही निष्क्रिय नाहीय. पाकिस्तानसोबत गोष्टी सकारात्मक दिशेने जावो किंवा नकारात्मक. आम्ही कुठल्याही परिस्थितीत उत्तर द्यायला तयार आहोत. योग्य दृष्टीकोन त्यांना दाखवावा लागेल”
झिरो टॉलरन्सच धोरण
याआधी सुद्धा परराष्ट्र मंत्री जयशंकर मे महिन्यात सीआयआयच्या एका बैठकीत बोलले होते. आधी त्यांना सीमेपलीकडून चालणारा दहशतवाद बंद करावा लागेल. भारत-पाकिस्तान संबंधांबद्दल जयशंकर यांची भूमिका एकदम स्पष्ट आहे. दहशतवादाबद्दल भारताच झिरो टॉलरन्सच धोरण असल्यात त्यांनी अनेकदा सांगितलय. पाकिस्तानने आधी आपली प्रतिमा सुधारावी असही ते म्हणाले. बांग्लादेशच्या मुद्यावरही त्यांनी भाष्य केलं. आम्ही तिथल्या सरकारशी बोलणी करण्यास सक्षम आहोत. तिथे सत्ता परिवर्तन झालय हे मान्य करावं लागेल. तिथल्या परिस्थितीवर आमच लक्ष आहे.