कोरोना रुग्णांचं दु:ख समजू शकतो, आपली लढाई एका अदृश्य शत्रूसोबत: पंतप्रधान मोदी

देशभरात सुरू असलेल्या कोरोना संकटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलं आहे. (Faced With Invisible Enemy, Can Feel Suffering Of Covid-Affected: Narendra Modi )

कोरोना रुग्णांचं दु:ख समजू शकतो, आपली लढाई एका अदृश्य शत्रूसोबत: पंतप्रधान मोदी
narendra modi
Follow us
| Updated on: May 14, 2021 | 4:03 PM

नवी दिल्ली: देशभरात सुरू असलेल्या कोरोना संकटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलं आहे. गेल्या 100 वर्षानंतर आलेली ही महामारी जगाची परीक्षा घेत आहे. या संकटात आपण अनेक जवळच्या लोकांना गमावले आहे. कोरोना रुग्णांचं दु:ख मी समजू शकतो. आपली एका अदृश्य शक्तीसोबत लढाई सुरू आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. (Faced With Invisible Enemy, Can Feel Suffering Of Covid-Affected: Narendra Modi )

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान सन्मान निधीचा 8 वा हप्ता जारी केला. यावेळी त्यांनी देशवासियांशी संपर्क साधला असता कोरोना संकटावर चिंता व्यक्त केली. कोविड रुग्णांचं दु:ख, वेदना मी समजू शकतो. आपली लढाई एका अदृश्य शक्तीसोबत आहे. या कोरोना व्हायरसमुळे अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावलं आहे. नागरिकांना जे दु:ख झालं. जे दु:ख अनेकांनी अनुभवलं आहे, मी ते दु:ख समजू शकतो, असं मोदी म्हणाले.

काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करा

100 वर्षानंतर ही महामारी आली आहे. ही महामारी पावलोपावली जगाची परीक्षा घेत आहे. या काळात आपण आपल्या जवळच्या लोकांना गमावलं आहे. गेल्या काही काळात देशावासियांनी जे भोगलं आहे. या संकटाच्या काळातही काही लोक स्वार्थासाठी औषधे आणि आवश्यक वस्तुंचा काळाबाजार करत आहेत. अशा लोकांवर कारवाई करण्याचे आवाहन मी राज्य सरकारांना करत आहे, असं त्यांनी सांगितलं.

आपण लढू आणि जिंकू

भारत हिंमत हरणारा देश नाही. कोणताही नागरिक हिंमत हरणार नाही. आपण लढू आणि जिंकू. देशभरातील रुग्णालयात मोफत लसीकरण केलं जात आहे. तुम्हीही लस टोचून घ्या. कोरोनाविरुद्धच्या लढाईत ही लस संरक्षण कवच म्हणून काम करेल. गंभीर आजारांपासून आपलं संरक्षण करेल. मास्क आणि सुरक्षित अंतर हे विसरून चालणार नाही, असंही ते म्हणाले.

शेतकऱ्यांशी संवाद

दरम्यान, कृषी सन्मान निधी योजनेचा हप्ता आज 9 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. प्रत्येकी दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. यावेळी मोदींनी देशातील निवडक शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. (Faced With Invisible Enemy, Can Feel Suffering Of Covid-Affected: Narendra Modi )

संबंधित बातम्या:

अशोक चव्हाणांनी औकातीत राहावं; चंद्रकांत पाटलांचा दम

Maharashtra Coronavirus LIVE Update : मीरा भाईंदरमध्ये लॉकडाऊनचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, थेट बारवर बुलडोझर फिरवला

पंतप्रधान, गृहमंत्री गायब, देश रामभरोसे; अहंकार सोडा, ‘महाराष्ट्र मॉडेल’ लागू करा: संजय राऊत

(Faced With Invisible Enemy, Can Feel Suffering Of Covid-Affected: Narendra Modi )

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.