Fact Check : 1 फेब्रुवारीपासून खरंच सर्व पॅसेंजर लोकल आणि स्पेशल ट्रेन सुरु होणार?
केद्र सरकारच्या प्रेस इन्फोर्मेशन ब्यूरोकडून (पीआयबी) याबाबतची खरी माहिती जारी करण्यात आली आहे (Fact check about local and passenger train). (Fact check about local and passenger train)
मुंबई : 1 फेब्रुवारी 2021 पासून देशभरात सर्व पॅसेंजर लोकल आणि स्पेशल ट्रेन सुरु होणार आहेत, अशा प्रकारची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, ही माहिती खरी आहे का? याबाबत केंद्र सरकारकडून अधिकृत माहिती जारी करण्यात आली आहे. केद्र सरकारच्या प्रेस इन्फोर्मेशन ब्यूरोकडून (पीआयबी) याबाबतची खरी माहिती जारी करण्यात आली आहे (Fact check about local and passenger train).
पीआयबीच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याबाबतचे वृत्त खोटं असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. “रेल्वे बोर्डाकडून 1 फेब्रुवारी 2021 पासून सर्व पैसेंजर ट्रेन, लोकल ट्रेन आणि स्पेशल ट्रेन सुरु केल्या जातील, असा दावा सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या एका फोटोत केला जात आहे. हा दावा खोटा आहे. रेल्वे मंत्रालयाकडून अशी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही”, असं पीआयबीने स्पष्ट केलं आहे.
याआधी रेल्वेचे माजी सीईओ वी के यादव यांनी डिसेंबर 2019 मध्ये रेल्वे कधी सुरु होणार याबाबत भाष्य केलं होतं. ट्रेन कधी सुरु होणार याबाबत अजून पर्यंत निर्णय झालेला नाही, अशी माहिती त्यांनी दिली होती (Fact check about local and passenger train).
दावा: एक #Morphed तस्वीर में दावा किया जा रहा है कि रेलवे बोर्ड ने 1 फरवरी 2021 से सभी पैसेंजर ट्रेन, लोकल ट्रेन और यात्री स्पेशल ट्रेन चालू करने का ऐलान किया है। #PIBFactCheck: यह दावा फ़र्ज़ी है। @RailMinIndia ने ऐसी कोई घोषणा नहीं की है। pic.twitter.com/TlZNaILj9w
— PIB Fact Check (@PIBFactCheck) January 22, 2021
तुम्ही देखीस फॅक्ट चेक करु शकता
सोशल मीडियावर अनेकदा खोटी आणि चुकीची माहिती देणारे मेसेज व्हायरल होत असतात. एखादा मेसेज किती खरा आहे याची पडताळ तुम्ही स्वत: करु शकतात. यासाठी तुम्ही पीआयबीच्या https://factcheck.pib.gov.in/ या वेबसाईटला भेट देऊ शकतात. त्याचबरोबर +918799711259 या नंबरवर व्हाट्सअॅप मेसेज करुन किंवा pibfactcheck@gmail.com या ईमेल आयडीला मेल करुन खरी माहिती मिळवू शकता.
हेही वाचा : अडीच वर्षीय वैदिशाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, 200 देशांच्या राजधानी आणि राष्ट्रध्वज तोंडपाठ