Fact Check : मोदी सरकारकडून विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप? या योजनेमागील सत्य काय?
सध्या सोशल मीडियावर देशभरातील विद्यार्थ्यांना मोदी सरकारकडून मोफत लॅपटॉप देण्यात येणार असल्याचा मेसेज फिरत आहे.
नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर देशभरातील विद्यार्थ्यांना मोदी सरकारकडून मोफत लॅपटॉप देण्यात येणार असल्याचा मेसेज फिरत आहे. कदाचित आपल्या किंवा ओळखीच्या कुणाच्या मोबाईलवरही असा मेसेज आला असेल. तुम्ही या मेसेजमधील लिंकवर क्लिक करुन नोंदणीही केली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. अनेकदा काही तरी मोफत किंवा कमी किमतीत मिळत असल्याचे मेसेज आपल्या मोबाईलवर येतात. मात्र, त्याकडे सावधगिरीने पाहिलं पाहिजे. सध्या मोदी सरकारच्या नावाने मोफत लॅपटॉप योजनेचा (Free Laptop Scheme) मेसेजही असाच बारकाईने पाहायला हवा. मग प्रश्न उपस्थित होतो की विद्यार्थ्यांना मोदी सरकार मोफत लॅपटॉप देणार आहे की नाही? (Fact check of Scheme of Modi government offering free laptops for all students)
खरंतर काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठी घोषणा केली आहे. यानुसार ममता सरकार उच्च माध्यमिक आणि मदरसामधील विद्यार्थ्यांना मोफत टॅब(Tab) देणार आहे. बंगालमधील ही घोषणा वास्तवात यायला बराच वेळ लागणार आहे. टेंडरपासून टॅबच्या वितरणापर्यंतच्या मोठ्या प्रक्रियेसाठी अनेक दिवस जाणार आहेत.
ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या, “लॉकडाऊनमध्ये गरजू विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासेसमध्ये सहभागी होता आले नाही. कारण त्यांच्या आई-वडिलांकडे कम्प्यूटर किंवा लॅपटॉप खरेदी करण्याची क्षमता नव्हती. विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नव्हते त्यामुळे त्यांचं नुकसान होत आहे. म्हणूनच आम्ही मोफत टॅब देण्याचा निर्णय घेतला आहे.”
पश्चिम बंगालमध्ये अशी घोषणा झाली आहे हे खरं आहे. पण मग देशभरातील विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप योजनेचं सत्य काय असा प्रश्न पडला असेल तर त्याचंही उत्तर पुढे आहे.
नेमका मेसेज काय आहे?
या मेसेजमध्ये एका अॅपची लिंक दिली आहे. या अॅपचं नाव Gov Laptop App असं आहे. या अॅपद्वारे नागरिकांना नोंदणी करण्यास सांगण्यात आलं आहे. येथे नोंदणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना मोदी सरकारकडून मोफत लॅपटॉप मिळणार आहे असा दावा करण्यात येत आहे.
मेसेजची सत्यता काय?
Claim: A text message with a website link is circulating with a claim that the Government of India is offering free laptops for all students. #PIBFactCheck: The circulated link is #Fake. Government is not running any such scheme. pic.twitter.com/VwDyFwcaf4
— PIB Fact Check (@PIBFactCheck) December 15, 2020
केंद्र सरकारच्या प्रेस इनफॉर्मेशन ब्युरोने (PIB) आपल्या फॅक्ट चेक मोहिमेत मोदी सरकारच्या नावे शेअर होत असलेल्या मोफत लॅपटॉपच्या योजनेची तपासणी केली आहे. त्यानंतर संबंधित मेसेज खोटा असून केंद्र सरकारने अशी कोणतीही योजना सुरु केलेली नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. व्हायरल होत असलेला मेसेज आणि लिंक फसवी आहे. PIB ने याबाबत ट्विट करुन अधिकृतपणे माहिती दिली आहे.
हेही वाचा :
Fact check | ‘पीएम निवृत्ती वेतन योजने’तून खरंच 70 हजार रुपये मिळणार?
Fact Check | गांजा कायदेशीर झाल्याचं ऐकून खूश होण्याआधी ‘हे’ वाचा, संयुक्त राष्ट्राकडून स्पष्टीकरण
Fact Check | मोदी सरकार विधवा महिलांना 5 लाख रुपये देणार? खरं काय?
Fact check of Scheme of Modi government offering free laptops for all students