सरकारच्या Fake News तपासणी करणाऱ्या विभागालाही सोडलं नाही, PIB ची फसवी वेबसाईटमागे कोण?

सायबर गुन्हेगारांनी थेट पीआयबीचीच बनावट वेबसाईट तयार करुन ती वेबसाईट पीआयबी विभागाची अधिकृत असल्याचा दावा केला.

सरकारच्या Fake News तपासणी करणाऱ्या विभागालाही सोडलं नाही, PIB ची फसवी वेबसाईटमागे कोण?
Follow us
| Updated on: May 24, 2021 | 4:42 AM

नवी दिल्ली : डिजीटल क्रांतीच्या या काळात अफवांचं (Fake News) पेव सुटलंय. खोट्या गोष्टी खऱ्या करुन प्रसारित केल्या जात आहेत. यावरच लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारचा प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) हा विभाग फॅक्ट चेकिंगचं (Fact Check) काम करत असतो. मात्र, आता फसवणूक करणाऱ्यांनी या विभागालाही सोडलेलं नाही. सायबर गुन्हेगारांनी थेट पीआयबीचीच बनावट वेबसाईट तयार करुन ती वेबसाईट पीआयबी विभागाची अधिकृत असल्याचा दावा केला. मात्र, पीआयबीने हा प्रकार लक्षात आल्यानंतर तातडीने याबाबत नागरिकांना माहिती देत सावध केलंय (Fake website of Press Information Bureau PIB Fact Check appeal of alert to citizens) .

पीआयबी फॅक्ट चेकची अधिकृत वेबसाईट असल्याचा दावा

PIBFactCheck याबाबत ट्विट करत सांगितलं, “काही लोकांनी http://pibfactcheck.in” नावाची वेबसाईट बनवलीय. त्यांच्याकडून ही वेबसाईट पीआयबी फॅक्ट चेकची अधिकृत वेबसाईट असल्याचा दावा करण्यात आलाय.” हे सांगतानाच पीआयबीने लोकांना या वेबसाईटच्या प्रभावात न येण्याचं आवाहन केलंय.

“केंद्र सरकारशी संबंधित कोणत्याही खोट्या माहितीची किंवा अफवांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी ट्विटरवर @PIBFactCheck ला फॉलोव करु शकता. तसेच https://pib.gov.in/factcheck.aspx या वेबसाईटला भेट देऊ शकता,” असंही पीआयबीने नमूद केलं. इतकंच नाही यावेळी पीआयबी फसवणूक करणाऱ्या वेबसाईटची एक यादीच जाहीर केली.

फसवणूक करणाऱ्या वेबसाईट्स

1. http://centralexcisegov.in/aboutus.php 2. https://register-for-your-free-scholarship.blogspot.com/ 3. https://kusmyojna.in/landing/ 4. https://www.kvms.org.in/ 5. https://www.sajks.com/about-us.php 6. https://register-form-free-tablet.blogspot.com/

PIB च्या नावाने वेबसाईट सुरु करणारे कोण?

या बनावट वेबसाईटवर पीआयबीच्या माहितीचा उपयोग करुनच अनेक बातम्या करण्यात आलेल्या आहेत. या वेबसाईटवर ही वेबसाईट एका ऑनलाईन मीडिया हाऊसची असल्याचं म्हटलंय. त्यांनी त्याबाबत सविस्तर लिहिलं आहे. संपादकाचं नाव प्रवीण असं देण्यात आलंय.

हेही वाचा :

सावधान, तुम्हालाही RBI गव्हर्नरच्या नावाने मेल आलाय का? ‘असं’ आहे फसवणुकीचं संपूर्ण प्रकरण

Fact Check : 31 मार्चपर्यंत सर्व रेल्वे रद्द झाल्याचा दावा, नेमकं सत्य काय?

Fact Check : 1 फेब्रुवारीपासून खरंच सर्व पॅसेंजर लोकल आणि स्पेशल ट्रेन सुरु होणार?

व्हिडीओ पाहा :

Fake website of Press Information Bureau PIB Fact Check appeal of alert to citizens

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.