Hariyana Suicide: हरियाणात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या, पत्नी-मुलासह पित्याने लावला गळफास, वाचा नेमके काय घडले?

धनौरीमध्ये कुटुंबाने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच जिंदचे एसपी नरेंद्र बिजरानिया घटनास्थळी पोहोचले. मात्र मृतांच्या नातेवाईकांनी खूनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यांना मारुन लटकवण्यात आले आहे. एसपींनी गावकरी आणि कुटुंबीयांशी या संपूर्ण प्रकरणाची चर्चा केली.

Hariyana Suicide: हरियाणात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या, पत्नी-मुलासह पित्याने लावला गळफास, वाचा नेमके काय घडले?
व्हॉट्सअपवर स्वतःच्या श्रद्धांजलीची पोस्ट टाकली, मग विष प्राशन करुन आत्महत्या
Follow us
| Updated on: Dec 22, 2021 | 6:32 PM

हरियाणा : खोटे आरोप केल्यामुळे दुःखी झालेल्या एकाच कुटुंबातील तिघांनी गळफास घेत सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हरियाणातील जींदच्या नरवाना क्षेत्रातील धनौरी गावात बुधवारी घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. घटनेची माहिती कळताच गढी पोलिस फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाले. मिळालेल्या माहितीनुसार महिनाभरात एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्या आहेत. मयतांमध्ये आई, वडिल आणि मुलाचा समावेश आहे.

या प्रकरणाचा संबंध दीड महिन्यापूर्वी झालेल्या एका व्यक्तीच्या हत्येशी जोडला जात आहे. सध्या गढी पोलीस स्टेशन या प्रकरणाचा वेगवेगळ्या अँगलने तपास करत आहे. ओमप्रकाश (48), त्यांची पत्नी कमलेश (45), मुलगा सोनू (20) अशी मयत व्यक्तींची नावे आहेत. तिघांनीही रात्री गळफास घेतल्याचे बोलले जात आहे.

एक महिन्यापूर्वी ओमप्रकाशच्या भावाने केली होती आत्महत्या

सुमारे 35 दिवसांपूर्वी धनौरी गावातील रहिवाशी नन्हा याचा मृतदेह 35 दिवसांपूर्वी हंसदाईहार नाल्याजवळ गोणीत बांधलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्याच्या गळ्यात दोरीही होती. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध खून आणि मृतदेहाची विटंबना केल्याचा गुन्हाही दाखल केला होता. मात्र गावकरी नन्हाच्या हत्येबाबत ओमप्रकाश आणि त्याचा भाऊ बलराज यांच्यावर संशय व्यक्त करत होते. यानंतर बलराज याने एक महिन्यापूर्वी शेतात कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली होती.

गढी पोलीस स्टेशनचे प्रभारी पवन कुमार यांनी सांगितले की, कुटुंबातील तिन्ही सदस्य घरामध्ये फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळले. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली असून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. मृतांनी पूर्वी एका व्यक्तीची हत्या केल्याचा संशय होता. या प्रकरणाचा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तपास केला जात आहे.

काय आहे सुसाईड नोटमध्ये?

पोलिसांना मयतांच्या घरातून एक सुसाईड नोट सापडली आहे. मयत ओमप्रकाशचा मुलगा सोनूने ही सुसाईड नोट लिहिले आहे. या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, ”मी माझ्या आई-वडिलांचा खुनी नाही आणि नन्हाची हत्या कोणी केली हे आम्हाला माहीत नाही. माझे आई-वडील नन्हूच्या कुटुंबीयांच्या भीतीने मरत आहेत. नानूची सून, कला, मुनी, मुनीचा मुलगा, कालाचा मुलगा, भीमाचे दोन्ही मुलगे. अंकितने केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ घरातील कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे. माझ्या मृत्यूला संपूर्ण गल्लीवाले जबाबदार आहेत कारण त्यांनी सत्याची बाजू घेतली नाही. संपूर्ण गल्ली नन्हूच्या बाजूने आहे. माझे माझ्या आयुष्यावर खूप प्रेम आहे, पण गावकऱ्यांच्या एकतर्फीपणामुळे मी माझा जीव गमावत आहे. एसएचओने दिलेली सर्व विधाने खरी आहेत. मी आणि माझे माता-पिता नन्हूच्या घरच्यांच्या भीतीने मरत आहेत. नन्हूच्या हत्येशी आमचा संबंध नाही. पण संपूर्ण गाव आम्हाला दोषी मानत असल्यामुळे आम्ही आत्महत्या करत आहोत.”

या गल्लीचा नाश होवो

आज कालाचा मुलगा अंकित आमच्या घरी भांडण करायला आला होता, तो दारू पिऊन सोनूला मारून टाकतो असे म्हणत घरावर विटा मारू लागला. मी पोलिसांना फोन केला, पोलीस आले आणि तुम्ही खोटे बोलत आहात, अशी धमकी दिली. संपूर्ण गल्ली ही घटना पाहत होती, पण कोणीही साक्ष दिली नाही. अंकित मारहाण करण्यासाठी आमच्या घरी आला आहे. देव या गल्लीचा नाश करो. है राम नवा (सोनू) जय बाबा गोरखनाथ, असेही सुसाईड नोटमध्ये लिहिण्यात आले आहे.

एसपी घटनास्थळी पोहोचले, कुटुंबात खळबळ उडाली

धनौरीमध्ये कुटुंबाने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच जिंदचे एसपी नरेंद्र बिजरानिया घटनास्थळी पोहोचले. मात्र मृतांच्या नातेवाईकांनी खूनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यांना मारुन लटकवण्यात आले आहे. एसपींनी गावकरी आणि कुटुंबीयांशी या संपूर्ण प्रकरणाची चर्चा केली. निष्पक्ष तपास आणि योग्य कारवाईचे आश्वासन दिले. घटनास्थळी पोलीस तपास सुरू आहे. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात येणार आहेत. (Family commits mass suicide in Haryana over false allegations)

इतर बातम्या

Nagpur | कर्ज फेडण्यासाठी बनला चोर, वाहनचालकाने केली गाड्यांची चोरी; विक्रीच्या बेतात असताना अडकला

Pimpri Chinchwad crime| …..फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.