शेतकऱ्याच्या खात्यात अचानक आले 100 अब्ज रुपये, एका रात्रीतून शेतकरी बनला अब्जाधीश
भानू प्रकाश याचे केसीसी खाते होते. त्यांनी शेतीसाठी कर्ज घेतले आहे. परंतु ते कर्ज न फेडल्यामुळे खाते एनपीएमध्ये गेले आहे. यामुळे इतकी मोठी रक्कम साध्या खात्यात येणे ही खूप आश्चर्याची गोष्ट आहे. आता या सर्व प्रकाराची चौकशी होणार आहे. त्यानंतर त्यातील सत्य प्रकार समोर येणार आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकरी सन्मान योजनेचे पैसे जमा होत असतात. जून महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 17 व्या हफ्त्याचे 2000 रुपये येणार आहेत. राज्य सरकारही तितकीच रक्कम शेतकऱ्यांना देणार आहे. परंतु चार हजाराऐवजी 100 अब्ज रुपये आले तर…अशीच एक घटना घडली आहे. शेतकऱ्याच्या खात्यात तब्बल 99999495999.99 रुपये आले आहेत. यामुळे फक्त शेतकरीच नाही तर बँकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यात ही घटना घडली आहे.
मोबाईलवर मेसेज आला अन्…
उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यात दुर्गागंज तालुक्यात अर्जुनपूर गाव आहे. या ठिकाणी असलेला शेतकरी भानू प्रकाश बिंद याचे सुरियावा येथील बँक ऑफ बडोद्यातील ग्रामीण बँकेत खाते आहे. 16 मे रोजी त्यांना अचानक त्यांच्या मोबाइलवर एक मेसेज आला. त्या मेसेजमध्ये खात्यात 99999495999.99 रुपये (99 अब्ज 99 कोटी 94 लाख 95 हजार 999 रुपये) जमा झाले. हा मेसेज वाचल्यावर भानू प्रकाश यांना धक्का बसला. त्यांनी इतरांना तो वाचण्यास दिला. सर्वांनी बँकेच्या खात्यात ही रक्कम झाल्याचा मेसेज असल्याचे म्हटले.
बँकेच्या अधिकाऱ्यांना धक्का
भानू प्रकाश यांनी थेट बँक गाठली. बॅकेत जाऊन त्यांनी कर्मचाऱ्यांना मेसेज दाखवला. कर्मचाऱ्यांनी त्यांचे खाते चेक केल्यावर त्यांनाही धक्का बसला. बँकेचे प्रभारी व्यवस्थापक आशीष तिवारी यांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी तपासणी केल्यावर भानू प्रकाश यांच्या खात्यात ही रक्कम जमा दिसली. त्यांच्या खात्यात ही रक्कम आली कशी, याचा शोध आता बँक कर्मचारी घेत आहेत. सध्या त्यांचे खाते होल्ड ठेवण्यात आले आहे.
भानू प्रकाश यांचे खाते एनपीएमध्ये
भानू प्रकाश याचे केसीसी खाते होते. त्यांनी शेतीसाठी कर्ज घेतले आहे. परंतु ते कर्ज न फेडल्यामुळे खाते एनपीएमध्ये गेले आहे. यामुळे इतकी मोठी रक्कम साध्या खात्यात येणे ही खूप आश्चर्याची गोष्ट आहे. आता या सर्व प्रकाराची चौकशी होणार आहे. त्यानंतर त्यातील सत्य प्रकार समोर येणार आहे.