Farmers Protest: सिंघू सीमेवर शेतकऱ्याची आत्महत्या; 26 नोव्हेंबरचं दिलं आंदोलकांनी अल्टिमेटम
पंजाबमधील सिंघू सीमेवर (Punjab Singhu Border) शेतकरी आंदोलनाच्या स्थळी एका 45 वर्षीय शेतकऱ्याने बुधवारी आत्महत्या केली. (Farmer suicide) एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत तो शेतकरी आढळला. 26 नोव्हेंबर रोजी शेतकरी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होत आहे.
नवी दिल्लीः पंजाबमधील सिंघू सीमेवर शेतकरी आंदोलनाच्या स्थळी एका 45 वर्षीय शेतकऱ्याने बुधवारी आत्महत्या केली. बुधवारी सकाळी आंदोलनस्थळी एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत तो शेतकरी आढळला. मिळालेल्या माहितीनुसार गुरप्रीत सिंग असे मृताचे नाव असून तो पंजाबमधील फतेहगढ साहिबमधील अमरोह जिल्ह्यातील रहिवासी होता. तो भारतीय किसान युनियन (BKU) एकता शी संबंधित होता. 2020 च्या तीन शेती कायद्यांविरोधात उत्तर भारतात शेतकरी आंदोलन करतायेत. (Farmer commits suicide Farmer protestors give ultimatun of Novernber 26)
शेती सुधारणा कायदा 2020 मागे घ्यावा आणि पिकांना किमान आधारभूत किमतीची हमी देण्यासाठी नवीन कायदा करावा सासारख्या मागण्याघेऊन शेकडो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर मागच्या वर्षीपासून तळ ठोकून आहेत. शेतकर्यांशी केंद्राच्या आतापर्यंत 11 औपचारिक बौठका झालेल्या आहेत, मात्र, केंद्राने नवीन कायदे शेतकरी हिताचे असल्याचे ठाम आहे.
26 नोव्हेंबरचं अल्टिमेटम
26 नोव्हेंबर रोजी शेतकरी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होत आहे. युनायटेड किसान मोर्चा (SKM) ने 26 नोव्हेंबर दिल्लीच्या सीमेवर मोठ्या सभा घेण्याची घोषणा केली आहे. त्याच दिवशी पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थानपासून दिल्लीपर्यंत सर्व आघाड्यांवर प्रचंड जनसमुदाय जमा केला जाईल आणि मोठे मेळावे घेतले जातील. 26 नोव्हेंबर हा संविधान दिनही आहे. 26 नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या सीमेवर असलेल्या सर्व राज्यांच्या राजधानीत शेतकरी एकत्र येणार आसल्याचं सांगणायेत येतय.
29 नोव्हेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत असताना दररोज 500 ट्रॅक्टर शेतकरी संसदेकडे कूच करणार आहेत. सिंगू सीमेवर मंगळवारी झालेल्या बैठकीत शेतकरी आंदोलनाची पुढील रणनीती ठरविण्यात आली आहे.
Other News