पोलिसांची व्हॅन, क्रेनवर आंदोलकांचा ताबा, मेट्रो बंद, शेतकरी आंदोलनाने तणाव; दिल्लीला छावणीचं स्वरुप

नवी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीवर पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर दिल्लीत तणाव निर्माण झाला आहे. (Farmers Clash With Cops In Delhi, Tractors Enter Red Fort )

पोलिसांची व्हॅन, क्रेनवर आंदोलकांचा ताबा, मेट्रो बंद, शेतकरी आंदोलनाने तणाव; दिल्लीला छावणीचं स्वरुप
शेतकरी आंदोलन
Follow us
| Updated on: Jan 26, 2021 | 2:25 PM

नवी दिल्ली: नवी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीवर पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर दिल्लीत तणाव निर्माण झाला आहे. आयटी येथे शेतकऱ्यांनी पोलिसांची व्हॅन, क्रेन ताब्यात घेतली आहे. त्यामुळे पोलीस या आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीमार करत आहे. शेतकरी आंदोलन अधिकच चिघळल्याने दिल्लीतील मेट्रोही बंद करण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे. शेतकरी लाल किल्ल्यात घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवल्याने संपूर्ण दिल्लीला छावणीचं स्वरुप आलं आहे. (Farmers Clash With Cops In Delhi, Tractors Enter Red Fort )

पोलिसांनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली काढण्यासाठी दुपारी 12 वाजेची वेळ दिली होती. पण संयुक्त शेतकरी मोर्चाच्या नेत्यांचं न ऐकता शेतकऱ्यांनी ही रॅली काढली. तसेच शेतकऱ्यांना रॅलीसाठी जो मार्ग आखून दिला होता. त्या मार्गावरून शेतकऱ्यांनी रॅली काढली नाही. शेतकऱ्यांनी वेगळ्याच मार्गाने रॅली काढली होती. सिंधु बॉर्डरवरून ही रॅली निघणार होती. मात्र, या मार्गाने न जाता शेतकरी आयटीओपर्यंत पोहोचले. त्यामुळे पोलिसांनी शेतकऱ्यांना अडवल्याने पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये धुमश्चक्री उडाली. त्यातच दगडफेक सुरू झाल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला. याचवेळी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवण्यास सुरुवात केली.

रस्ते ब्लॉक

शेतकऱ्यांचं आंदोलन थोपवण्यासाठी पोलिसांनी अक्षरधाम आणि आश्रम येथील रस्ते ब्लॉक केले आहेत. रस्ते बंद असले तरी शेतकरी अक्षरधामच्या दिशेने कूच करत आहेत. तर आश्रम रोडवरून आंदोलकांनी येऊ नये म्हणू पोलिसांनी रस्त्यात जेव्हीसी मशीन उभी केली आहे. मात्र, त्यामुळे सामान्य नागरिकांची चांगलीच पंचाईत झाली असून वाहतुकीसाठी रस्ता उघडण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. शेतकरी आक्रमक झाल्याने पोलिसांनी जीटी करनाल रोड, आऊटरिंग रोड, बादली रोड मधुबन चौक, नरेला रोड आदी मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली असून या मार्गावरून प्रवास न करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. तसेच वजीराबाद रोड, आयएसबीटी रोड, पुश्ता रोड, विकास मार्ग, एनएच-24 रोड आणि नोएडा लिंक रोडवरही वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. (Farmers Clash With Cops In Delhi, Tractors Enter Red Fort )

मेट्रो बंद

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील मेट्रो सेवा बंद करण्यात आली आहे. इंद्रप्रस्थ मेट्रो स्टेशनचे सर्व एन्ट्री आणि एक्झिट गेट बंद करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे बादली, रोहिणी सेक्टर 18-19, हैदरपूर बादली मोड, जहांगीरपुरी, आदर्श नगर, आझादपूर, मॉडल टाउन, जीटीबी नगर, विद्यापीठ, विधानसभा आणि सिविल लाइन्समधील मेट्रोचे गेट बंद करण्यात आले आहेत. (Farmers Clash With Cops In Delhi, Tractors Enter Red Fort )

संबंधित बातम्या:

Kisan Tractor Rally: दिल्लीत ट्रॅक्टर रॅली दरम्यान पोलीस-शेतकरी भिडले, दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीचार्ज

72 Republic Day LIVE UPDATES | राष्ट्रगीतासह प्रजासत्ताक दिनाच्या दिमाखदार सोहळ्याची सांगता

दिल्लीच्या सीमेवर ट्रॅक्टर रॅली, हजारोंच्या संख्येने शेतकरी सामील होणार

Republic Day: राजपथावरील संचलनात महाराष्ट्राचा देखणा चित्ररथ; व्हिडीओ पाहिलात का?

(Farmers Clash With Cops In Delhi, Tractors Enter Red Fort )

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.