प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मार्चमध्ये घातपाताचा कट, आरोपीकडून षडयंत्राची कबुली

शेतकरी ट्रॅक्टर मार्चमध्ये घातपात करण्याचा कट होत असल्याची खळबळजनक माहिती समोर आलीय.

प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मार्चमध्ये घातपाताचा कट, आरोपीकडून षडयंत्राची कबुली
Follow us
| Updated on: Jan 23, 2021 | 12:20 AM

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर अद्यापही काहीही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे शेतकरी आगामी प्रजासत्ताक दिनी (26 जानेवारी) ट्रॅक्टर मार्चचं आयोजन करणार आहेत. मात्र, या ट्रॅक्टर मार्चमध्ये घातपात करण्याचा कट होत असल्याची खळबळजनक माहिती समोर आलीय. शेतकऱ्यांनी संबंधित आरोपीला पकडून पत्रकार परिषदेतच बोलतं केलंय. आरोपीनेही या षडयंत्राची धक्कादायक कबुली दिलीय (Farmers exposed the plan to kill 4 farmer leader during protest on Sindhu Border).

दिल्लीच्या सिंधु बॉर्डरवर शेतकरी आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी एका संशयिताला पकडलंय. संबंधित आरोपी आंदोलनातील 4 प्रमुख शेतकरी नेत्यांच्या हत्येचा कट रचत असल्याचा आरोप होत आहे. तसेच आगामी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मार्चमध्ये देखील अडथळे निर्माण करण्याचा कट रचला जात असल्याचं समोर आलंय. शेतकऱ्यांनी आरोपीला आपल्या राबलेल्या हाताचा चमत्कार दाखवताच त्याने थेट पत्रकार परिषदेत आपल्या कटाची कबुली दिलीय.

आरोपी म्हणाला, “आम्हाला दोन ठिकाणी हत्यारं देण्यात आलीत. 26 जानेवारीला जसे शेतकरी ट्रॅक्टर मार्चमधून पुढे जाण्याचा प्रयत्न करतील तसे त्यांच्यावर गोळीबार करण्यात येणार होता. आधी शेतकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला जाणार होता. जर शेतकरी थांबले नाही तर त्यांच्यावर गोळीबार करण्याचे आदेश आहेत. पहिल्यांदा गुढग्यांवर गोळी झाडण्यात येणार होत्या. त्यानंतर 10 जणांची आमची एक टोळी आहे ती मागच्या बाजूने गोळीबार करणार होते. त्यामुळे पोलिसांनाच वाटावं की शेतकऱ्यांनीच हा गोळीबार केलाय.”

“26 जानेवारीच्या मार्चमध्ये पोलिसांच्या वेशात आमचे निम्मे लोक राहणार आहेत. ते शेतकऱ्यांना पळवून लावण्यासाठी आहेत. 24 जानेवारीला शेतकरी आंदोलनाच्या स्टेजवर उपस्थित असणाऱ्या 4 प्रमुख नेत्यांची हत्या करण्याचेही आदेश देण्यात आलेत. त्या चौघांचे फोटोही देण्यात आलेत. आम्हाला परदिप सिंग याच्याकडून आदेश येतात. तो एका पोलीस स्टेशनमध्ये अधिकारी आहे. तो जेव्हा जेव्हा आम्हाला भेटायला यायचा तेव्हा तोंड झाकून यायचा, पण आम्ही त्याच्या शर्टवरील बॅच पाहिला होता,” असंही या आरोपीने नमूद केलंय.

हेही वाचा :

सरकार आणि शेतकऱ्यांमधील चर्चेची 11वी फेरीही निष्फळ, प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली होणारच

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत महाराष्ट्रात एल्गार, 20 हजार शेतकऱ्यांचा वाहन मार्च निघणार

शेतकरी आंदोलन ते अर्थव्यवस्था, CWC बैठकीत सोनिया गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

व्हिडीओ पाहा :

Farmers exposed the plan to kill 4 farmer leader during protest on Sindhu Border

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.