शेतकऱ्यांचा मोर्चा पोलिसांनी शंभू सीमेवर अडवला, काही आंदोलक जखमी

शंभू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आंदोलनाची नवी दिशा ठरवली आहे. शेतकऱ्यांचा मोर्चा पोलिसांनी रोखल्यानंतर आता शेतकऱ्यांनी नवी योजना जाहीर केली आहे. शेतकरी नेते सर्वनसिंग म्हणाले की, काही शेतकरी जखमी झाल्यामुळे आम्ही आजचा 'जथा' परत बोलावला आहे.

शेतकऱ्यांचा मोर्चा पोलिसांनी शंभू सीमेवर अडवला, काही आंदोलक जखमी
Follow us
| Updated on: Dec 06, 2024 | 6:07 PM

शेतकऱ्यांचा मोर्चा पुन्हा एकदा दिल्लीकडे निघाला आहे. आज हा मोर्चा सुरक्षा दलाच्या जवानांनी आणि पोलिसांनी शंभू सीमेवर अडवला. यावेळी अश्रूधुराच्या नळकांड्या ही फोडल्या. ज्यामुळे काही शेतकरी जखमी झाल्याची बातमी आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी आता हा मोर्चा पुढे ढकलला आहे. दिल्लीकडे पायी निघालेला हा मोर्चा आता रविवारी पुढे निघणार आहे. शेतकरी नेते सर्वनसिंग म्हणाले की, काही शेतकरी जखमी झाल्यामुळे आम्ही शेतकऱ्यांचा मागे बोलवलं आहे. ते आता परवा परत पुढे जायला निघणार आहेत.

शेतकरी नेते सर्वन सिंग म्हणाले की, हरियाणा पोलिसांच्या एसपींनी आज आम्हाला विचारले होते की तुम्हाला सरकारशी कोणत्या स्तरावर चर्चा करायची आहे. आम्ही त्यांना सांगितले की, आम्ही कोणत्याही केंद्रीय मंत्र्याशी किंवा विशेषत: कृषीमंत्र्यांशी चर्चा करायला तयार आहोत. ते म्हणाले की, हरियाणा पोलिसांच्या एसपींनी सांगितले आहे की, केंद्र सरकारला एक दिवसाची वेळ दिली आणि जखमी शेतकऱ्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची प्रतीक्षा करण्यासाठी आणि केंद्र सरकारशी चर्चा करण्यासाठी आमचे आंदोलन एक दिवसासाठी स्थगित केले.

हरियाणा पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर शेतकरी नेते सर्वन सिंह म्हणाले की, आम्हाला पोलिसांशी कोणताही संघर्ष नकोय. आम्हाला दिल्लीला जाण्याची परवानगी द्यावी किंवा केंद्र सरकारने आमच्याशी चर्चा करावी. हरियाणा सरकारने आमच्याकडून मागण्या काय आहेत याबाबत पत्र मागितले आहे. आम्ही चर्चेची वाट पाहू. त्यानंतर पुढची रणनीती ठरवू. पंजाबमध्ये आम्ही ठरवलंय की, भाजपचे नेते जिथे जातील तिथे शांततेने निषेध केला जाईल.

आज जवळपास १०० शेतकरी शंभू सीमेवरुन दिल्लीकडे पायी कूच करत असताना हरियाणा पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेड्समुळे त्यांना काही मीटर अंतरावर रोखण्यात आले. आंदोलकांना पांगवण्यासाठी सुरक्षा जवानांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. ज्यामुळे अनेक जण जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हरियाणा पोलिसांनी कलम 163 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याचा दावा त्यांनी केला आहे.

सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.