Hariyana Crime: चार वर्षाच्या मुलीसह पित्याची चौथ्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या, वाचा नेमके काय घडले ज्याने संपूर्ण हरियाणा हादरले

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार आर्थिक चणचणीमुळे विक्की नेहमी चिंतेत असायचा. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता त्याला सतावत होतीय याच आर्थिक विवंचनेतून त्याने आत्महत्या केली. भिवानी जिल्ह्यातील बन्सीलाल जनरल हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावरुन शुक्रवारी रात्री मुलीसह उडी घेत विक्कीने आत्महत्या केली.

Hariyana Crime: चार वर्षाच्या मुलीसह पित्याची चौथ्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या, वाचा नेमके काय घडले ज्याने संपूर्ण हरियाणा हादरले
भोजपुरी नायकाकडून पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या
Follow us
| Updated on: Dec 19, 2021 | 6:20 PM

भिवानी : आर्थिक विवंचनेतून एका व्यक्तीने आपल्या चार वर्षाच्या मुलीसह चौथ्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना हरियाणातील भिवानी येथे घडली आहे. या घटनेत वडिलांचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी मुलीचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. विक्की असे मयत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

उच्चशिक्षित असूनही बेरोजगार होता

हरियाणातील भिवनी जिल्ह्यातील सराय चौपाटा येथे विक्की आपल्या कुटुंबासोबत राहतो. विक्कीला तीन मुले आहेत. विक्कीचे शिक्षण एमएपर्यंत झाले होते. मात्र उच्चशिक्षित असूनही नोकरी मिळत नसल्याने तो गल्लोगल्ली फिरुन रद्दीचा धंदा करीत होता. आधीच बेरोजगारीमुळे काहीतरी धंदा करुन कसेतरी कुटुंबाचा उदारनिर्वाह चालवत होता. त्यात कोरोनामुळे दोन वर्ष धंदा ठप्प असल्याने आर्थिक संकटात सापडला. तसेच काही दिवसांपूर्वी त्याला डेंग्यू झाला होता. त्यामुळे खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. त्याच्या उपचारावरही भरपूर खर्च झाला. या सर्वामुळे तो नेहमी टेन्शनमध्ये असायचा.

रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरुन मारली उडी

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार आर्थिक चणचणीमुळे विक्की नेहमी चिंतेत असायचा. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता त्याला सतावत होतीय याच आर्थिक विवंचनेतून त्याने आत्महत्या केली. भिवानी जिल्ह्यातील बन्सीलाल जनरल हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावरुन शुक्रवारी रात्री मुलीसह उडी घेत विक्कीने आत्महत्या केली. यात विक्की जागीच मृत्यू झाला. तर त्याची चार वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान तिचा दुर्देवी मृत्यू झाला. नातेवाईकांच्या जबानीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची कारवाई केल्याचे दिनोद गेट चौकीचे प्रभारी प्रवीण कुमार यांनी सांगितले. पोलिसांनी दोघांचेही शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. (Father commits suicide by jumping from fourth floor with four-year-old daughter in hariyana)

इतर बातम्या

Car Accident | अक्सा बीचजवळ कारचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू, 6 जण जखमी

Gondia murder | भाऊच ठरला कर्दनकाळ, उपचाराला खर्च लागतो म्हणून संपविले, मतिमंद भावाची गळा दाबून हत्या!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.