दुर्दैवी ! लेकाच्या वाढदिवशीच वडिलांनी घेतला अखेरचा श्वास, केक कापतानाच … तिथे नेमकं काय झालं ?
मुलाच्या वाढदिवसानिमित्त घरी सगळे आनंदात होते. मुलगा केक कापत होता न होताच त्याचे वडील बेशुद्ध पडले. तातडीने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना ...

लखनऊ | 7 सप्टेंबर 2023 : आयुष्याचा काहीच भरोसा नाही. मृत्यू, कसा, कधी, कुठूनही येऊ शकतो. एका क्षणात होत्याचं नव्हतं होतं. अशाच एका दुर्दैवी मृत्यूची घटना लखनऊध्ये घडली. शहरातील एका कॉलनीमधील घरात मुलाचा वाढदिवस साजरा करत असतानाच, केक कापत असतानाच त्याचे वडील (father unconscious) बेशुद्ध होऊन जमिनीवर पडले. हार्टॲटॅक आल्याने त्यांचा मृत्यू (death due to heart attack) झाला. मात्र सावकाराच्या तगाद्यामुळेच कुटुंबप्रमुखाला आपला जीव गमवावा लागला, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.
उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊमधील मुलायम नगर येथे हा दुर्दैवी प्रकार घडला. तेथे सुशील शर्मा (45 वर्षे) हे त्यांची पत्नी आणि साक्षी, सार्थक आणि मन्नत या तिघांसह राहत होते. बुधवारी सार्ख याचा वाढदिवस होता. रात्री सगळे जण मिळून घरी केक कापत होते. मात्र तेवढ्याच सुशील हे बेशुद्ध झाले आणि जमिनीवर पडले. त्यांना उपचारांसाठी तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हार्टॲटॅक आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलिस तेथे दाखल झाले आणि त्यांनी शर्मा यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.
घराच्या कर्जाचं होतं टेन्शन ?
शर्मा यांच्या पत्नीची किरण यांची रडून-रडून वाईट अवस्था झाली आहे. किरण यांच्या सांगण्यानुसार, त्यांच्या घरावर 22 लाख रुपयांचं कर्ज होतं. त्यासाठी दर महिन्याला 70 हजार रुपयांचा हप्ता भरावा लागत असे. मात्र या महिन्याता काही कारणामुळे हफ्त्याची रक्कम कमी भरली गेली. त्यामुळे कर्ज देणारे इसमा शर्मा यांना वाट्टेल तसं बोलले, त्यांनी शर्मा यांना खूप अपमानित केलं होतं. त्यामुळे सुनील खूप चिंतेत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. तक्रार मिळाली तर आरोपींविरोधात कारवाई करण्यात येईल.