‘ज्याला अडचण आहे, त्याने पाकिस्तानात निघून जावं’, राम मंदिर प्राण प्रतिष्ठेला आलेल्या इमामाने धुडकावला फतवा
Ram Mandir | ऑल इंडिया इमाम ऑर्गनायजेशनचे चीफ डॉ इमाम उमेर अहमद इलियासी म्हणाले की, "जे माझे विरोधक आहेत, ते देशविरोधी आहेत. मी देशाविरोधात कोणतही काम केलेलं नाही. मी देशहिताच्या दृष्टीनेच अयोध्येत राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला गेलो होतो. प्रेम हाच माझा संदेश आहे"
Ram Mandir | अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा झाला. या कार्यक्रमाला ऑल इंडिया इमाम ऑर्गनायजेशनचे चीफ डॉ इमाम उमेर अहमद इलियासी उपस्थित होते. या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यापासून डॉ इमाम उमेर अहमद इलियासी कट्टरपंथीयांच्या निशाण्यावर आले आहेत. त्यांच्याविरोधात फतवा जारी करण्यात आला आहे. त्यांना फोनवरुन जीवे मारण्याची धमकी मिळत आहे. “मी फतवा मानत नाही. काहीही होऊ दे मी माफी मागणार नाही. ज्यांना अडचण असेल, त्यांनी भारत सोडून पाकिस्तानात निघून जाव” असं डॉ इमाम उमेर अहमद इलियासी म्हणाले.
डॉक्टर इमाम उमेर अहमद इलियासी TV9 भारतवर्षशी बोलले. “माझा हातात तो फतवा आहे, मला राम जन्मभूमी ट्रस्टकडून प्राण प्रतिष्ठेच निमंत्रण मिळालं होतं. मी त्यांच्या निमंत्रणाचा स्वीकार केला. मी 2 दिवस विचार केला. मला वाटलं की, आपल्या देश हिताच्या दृष्टीने सौहार्दच एक चांगल वातावरण बनेल. हा विचार करुन मी कार्यक्रमाला गेलो. मला माहित होतं, विरोध होईल, पण इतका विरोध होईल याची कल्पना नव्हती” असं डॉक्टर इमाम उमेर अहमद इलियासी म्हणाले.
‘आपल्या सगळ्यांच्या जाती वेगळया असू शकतात’
“मी अयोध्येत पोहोचलो, तेव्हा अयोध्येतील जनतेने माझ स्वागत केलं. साधू संतांनी माझ स्वागत केलं. सगळ्यांनी आनंद व्यक्त केला. माझा एकच संदेश आहे, प्रेम. मी म्हटलय की, आपल्या सगळ्यांच्या जाती वेगळया असतील, धर्म, श्रद्धा वेगळ्या असू शकतात. पण सर्वात आधी आपण माणूस आहोत” असं इमाम उमेर अहमद इलियासी म्हणाले.
‘कुटुंबाला धमक्या मिळत आहेत’
अहमद इलियासी म्हणाले की, “आपण भारतात राहतो, भारतीय आहोत. आपण सर्वांनी मिळून भारताला मजबूत बनवूया. आमच्यासाठी राष्ट्र सर्वोपरि आहे. हेच माझ वक्तव्य होतं” “त्या विरोधात फतवा जारी करण्यात आलाय. “माझ्याविरोधात देशभरातून फतवे येत आहेत. मी जेव्हापासून अयोध्येवरुन परतलोय, माझ्या फोनवर मला आणि माझ्या कुटुंबाला धमक्या मिळत आहेत” असं इमाम उमेर अहमद इलियासी यांनी सांगितलं.
‘मी शहीद होण्यासाठी तयार’
फतवा जारी करणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की, “मी हा फतवा मानत नाही. मी माफी मागणार नाही आणि राजीनामा सुद्धा देणार नाही. मला बॉयकॉट करायचय करा. मला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. मी शहीद होण्यासाठी तयार आहे. मी देशाहितासाठी अयोध्येत गेलो होतो. राष्ट्रहिताच्या दृष्टीने मी शहीद झालो, तर मला पर्वा नाही”