देशात कोणत्या धर्मात जास्त मुलं जन्माला येतायेत, हिंदू की मुस्लीम?, प्रजनन दरात वाढ की घट? घ्या जाणून
आत्तापर्यंतच्या पाच सर्वेक्षणांचा अभ्यास केल्यास, सर्वाधिक घट ही मुस्लीम समुदायात झाली असली तरी त्यांचा जन्मदर इतर धर्मियांच्या तुलनेत तरीही जास्तच आहे. 1992 च्या पहिल्या सर्वेक्षणात मुस्लिमांचा जन्मदर 4.41 टक्के होता, तो आता पाचव्या सर्वेक्षणात 2.36 वर आला आहे.
नवी दिल्ली – देशाची लोकसंख्या (India Population) वाढते आहे की कमी होते आहे?, कोणत्या धर्मात जास्त मुलं जन्माला येतायेत., हिंदू की मुस्लीम?, असे असंख्य प्रश्न देशातील जनतेच्या मनात कायम असतात. या सगळ्यांची उत्तर देणारा राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा (National family health survey) अहवाल समोर आला आहे. यात सर्वात महत्त्वाची बाब समोर आली आहे ती म्हणजे देशातील मुलांचा जन्म होण्याचा वेग कमी होत चालला आहे. या अहवालानुसार देशातील मुलांचा प्नजननदर 2.2 टक्क्यांवरुन 2 टक्के झाला आहे. देशाची एकूण प्रजनन क्षमता कमी होते आहे. ( total fertility rate) विशेष म्हणजे सर्वच धर्मियांत हा जन्मदर आधीच्या तुलनेत कमी झाला आहे. मुलींबाबत उशिरा का होईना पण देशातील जनतेची धारणा बदलताना दिसते आहे. देशात 2 मुली असलेल्या एकूण महिलांपैकी 65 टक्के महिलांना आता मुलगा जन्माला घालावा, अशी इच्छा नाहीये. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे–5च्या ताजा अहवालात ही माहिती समोर आली आहे.
India’s total fertility rate declines from 2.2 to 2.0: National Family Health Survey
हे सुद्धा वाचाRead @ANI Story | https://t.co/nAmc2kVeUN#FertilityRate #NationalFamilyHealthSurvey #India pic.twitter.com/4hftjNviCu
— ANI Digital (@ani_digital) May 6, 2022
कोणत्या धर्माची लोकसंख्या गतीने वाढते आहे
देशातील सगळ्याच धर्मात आधीच्या तुलनेत कमी मुलं जन्माला येत आहेत. 2015-16 सालात करण्यात आलेल्या चौथ्या सर्वेक्षणात आणि 2019-21 या काळात करण्यात आलेल्या पाचव्या सर्वेक्षणात हेच समोर आले आहे की, उच्च प्रजनन दर असलेल्या समुहातही घट झालेली आहे. मुस्लीम धर्माचा विचार केला तर, दोन्ही सर्वेक्षणात त्यांचा प्रजनन दर 2.66 वरुन 2.36 पर्यंत आला आहे. सुमारे 9.9 टक्क्यांची सर्वात मोठी घट इतर धर्मियांपेक्षा मुस्लिमांमध्ये दिसते आहे.
प्रजनन दरात घट, लोकसंख्या स्थिर
1992-93 साली या प्रजनन दराच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली होती. त्यावेळी हा दर 3.4 टक्के होता, तो आता 2021 मध्ये 2.0 टक्क्यांवर आला आहे. यात 40 टक्के घट झाली आहे. प्रजनन दरात घट झाल्याने लोकसंख्या स्थिर राहण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
सर्वाधिक घट असूनही मुस्लिमांत जन्मदर अधिक
आत्तापर्यंतच्या पाच सर्वेक्षणांचा अभ्यास केल्यास, सर्वाधिक घट ही मुस्लीम समुदायात झाली असली तरी त्यांचा जन्मदर इतर धर्मियांच्या तुलनेत तरीही जास्तच आहे. 1992 च्या पहिल्या सर्वेक्षणात मुस्लिमांचा जन्मदर 4.41 टक्के होता, तो आता पाचव्या सर्वेक्षणात 2.36 वर आला आहे. या काळात मुस्लिमांच्या प्रजनन दरात 46.5 टक्क्यांची घट झाली असली, तरी त्यांचा आत्ताचा प्रजनन दर 2.36 टक्के हा इतर धर्मियांपेक्षा अधिकच आहे. हिंदुंचा जन्मदर पहिल्या सर्वेक्षणात 3.3 टक्के होता तो आता पाचव्या सर्वेक्षणात प्रजनन दरात 41.2 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. ख्रिश्चनांचा जन्मदर 2.87 टक्क्यांवरुन 1.88 टक्क्यांवर आलाय.
प्रत्येक राज्यांत जन्मदराचे प्रमाण वेगवेगळे
धर्मांचा विचार केला तर प्रत्येक राज्यात धर्माच्या आकडेवारीचा विचार केला तर त्यांचा प्रजनन दर वेगवेगळा आहे. उ. प्रदेशात हिंदुंचा प्रजनन दर 2.29 टक्के आहे, तर तामिळनाडूत तो 1.75 टक्के आहे. याचप्रमाणे मुस्लिमांचा विचार केला तर त्यांचा उ. प्रदेशातील प्रजनन दर 2.66 टक्के आहे, तो तामिळनाडूत 1.93 टक्के आहे.
देशातील घरगुती हिंसाचारांच्या प्रकारांत वाढ
मुलांचा प्रजनन दर कमी होत असला तरी देशातील घरगुती हिंसाचारांच्या प्रकरणांत मात्र घट झालेली नाही. देशातील 79 टक्के महिला या घरगुती हिंसाचाराच्या बळी आहेत. पतीकडून होत असलेल्या अत्याचारांची तक्रार मात्र करण्यात येत नाही. लैंगिक अत्याचारांत 99.5 टक्के महिला गप्प राहणेच पसंत करतात.
32 टक्के विवाहित महिला नोकरी करतात
देशात अद्यापही 59 टक्के महिला अशा आहेत की ज्यांना बाजारत, हॉस्पिटल किंवा गावाबाहेर जाण्याची परवानगी मिळत नाही. तर देशातील 32 टक्के महिला विवाहानंतरही नोकरी करतायेत.