AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुजरातच्या जामनगर येथे लढाऊ विमान कोसळले, सर्वत्र आगीचे लोळ, एका पायलटचा मृत्यू तर दुसरा जखमी

गुजरातमधील जामनगरच्या बाहेर एक लढाऊ विमान कोसळल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा घडली आहे. अपघातानंतर विमानाचे अनेक तुकडे झाले. त्याला मोठी आग लागली असून अपघातस्थळी ग्रामस्थ, पोलिस आणि प्रशासन दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु आहे.

गुजरातच्या जामनगर येथे लढाऊ विमान कोसळले, सर्वत्र आगीचे लोळ, एका पायलटचा मृत्यू तर दुसरा जखमी
Follow us
| Updated on: Apr 02, 2025 | 10:38 PM

गुजरातच्या जामनगर जिल्ह्यात लढाऊ विमानाला मोठा अपघात झाला आहे. बुधवारी रात्री उशीरा कलावड रोडवर सुवरदा गावांच्या बाहेरील परिसरात भारतीय वायू सेनेचे जग्वार विमान कोसळूल्याची घटना घडली आहे. या विमानाचे तुकडे सर्वत पसरले असून सर्वत्र आगीचे लोळ उठल्याने गावकरी घाबरले. सुवरदा गावातील लोकांना कानठळ्या बसविणारा आवाज ऐकायला आल्याने ते घटनास्थळी पोहचले. या दुर्घटनेसंबंधी स्थानिक पोलिसांना कळवल्यानंतर पोलीसांचे पथक घटनास्थळी पोहचले आहे.

गुजरातमधील जामनगरच्या बाहेर एक लढाऊ विमान कोसळल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा घडली आहे.. ही घटना कलावड रोडवरील सुवर्णा गावाजवळ घडली. या लढावू विमानाच्या अपघातात एका पायलटचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा एक पायलट जखमी झाल्याचे वृत्त आहे. अपघातानंतर विमानाचे अनेक तुकडे झाले. त्याला मोठी आग लागली असून अपघातस्थळी ग्रामस्थ, पोलिस आणि प्रशासन दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु आहे.

हे सुद्धा वाचा

येथे पोस्ट पाहा –

यापूर्वी ७ मार्च रोजी हरियाणातील पंचकुला येथे तांत्रिक बिघाडामुळे हवाई दलाचे जॅग्वार लढाऊ विमान कोसळले होते. हे लढाऊ विमान अंबाला एअरबेसवरून प्रशिक्षणासाठी निघाले होते.

या अपघातात, वैमानिक जेटमधून सुरक्षितपणे बाहेर पडण्यात यशस्वी झाला. त्याच दिवशी, रशियन बनावटीचे भारतीय हवाई दलाचे AN-32 हे वाहतूक विमान पश्चिम बंगालमधील बागडोगरा येथे उतरल्यानंतर कोसळले.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO
दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO.
ट्रम्प भरकटलेत..ब्रिटीश लेखकाची चीन तुर्कीवर टीका,अमेरिकेला काय सल्ला?
ट्रम्प भरकटलेत..ब्रिटीश लेखकाची चीन तुर्कीवर टीका,अमेरिकेला काय सल्ला?.
दहशतवादी आमिर नझिर वाणीने मृत्यूपूर्वी बहिणीला केला होता व्हिडीओ कॉल
दहशतवादी आमिर नझिर वाणीने मृत्यूपूर्वी बहिणीला केला होता व्हिडीओ कॉल.
मान्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मेपर्यंत केरळात धडकणर महाराष्ट्रात कधी?
मान्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मेपर्यंत केरळात धडकणर महाराष्ट्रात कधी?.
तर मला आणि आंबेडकरांना सुद्धा एकत्र यावं लागेल, आठवलेंचं मोठं वक्तव्य
तर मला आणि आंबेडकरांना सुद्धा एकत्र यावं लागेल, आठवलेंचं मोठं वक्तव्य.
त्रालमध्ये 3 दहशतवादी ठार, जैश टॉप कमांडरचाही सहभाग, बघा ड्रोन दृश्य
त्रालमध्ये 3 दहशतवादी ठार, जैश टॉप कमांडरचाही सहभाग, बघा ड्रोन दृश्य.
मी भारतात उत्पादनामध्ये इच्छुक नाही, ट्रम्प यांचे टीम कुकना आd
मी भारतात उत्पादनामध्ये इच्छुक नाही, ट्रम्प यांचे टीम कुकना आd.
Boycott Turkey: पाकला दिलेली साथ तुर्कीला भोवणार, भारतातून मोठा निर्णय
Boycott Turkey: पाकला दिलेली साथ तुर्कीला भोवणार, भारतातून मोठा निर्णय.
शरद पवारांच्या समोरच शेतकऱ्याने घेतलं तोंड झोडून, नेमंक काय घडलं?
शरद पवारांच्या समोरच शेतकऱ्याने घेतलं तोंड झोडून, नेमंक काय घडलं?.
त्यांनी धर्म विचारला होता, आम्ही कर्म पाहून मारलं - मंत्री राजनाथ सिंह
त्यांनी धर्म विचारला होता, आम्ही कर्म पाहून मारलं - मंत्री राजनाथ सिंह.