नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी दुर्घटना; नर्सिंग होमला भीषण आग, दोघांचा होरपळून मृत्यू, अनेकजण अडकले

तासा दीडतासाच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. मात्र, अजूनही आगीच्या ज्वाळा निघताना दिसत असून धूरही निघत आहे. लवकरच ही आग पूर्णपणे विझवली जाणार आहे.

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी दुर्घटना; नर्सिंग होमला भीषण आग, दोघांचा होरपळून मृत्यू, अनेकजण अडकले
नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी दुर्घटनाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 01, 2023 | 9:13 AM

नवी दिल्ली: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी नवी दिल्लीत मोठी दुर्घटना घडली आहे. येथील एका नर्सिंग होमला आज सकाळीच भीषण आग लागली. ही आग अत्यंत भीषण होती. बघता बघता आगीचं तांडव झालं. त्यामुळे एकच हाहाकार माजला. रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्णांची एकच धावपळ उडाली. या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर आगीत अनेकजण अडकले असून त्यांची सुटका करण्यात येत आहे. अग्निशमन दलाने आतापर्यंत सहा जणांची सुटका केली आहे. अजून काही लोकांची सुटका करण्यात येत असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. आधी भूकंपाचे धक्के आणि आता आग लागल्याने दिल्लीकरांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

आज पहाटे सव्वा पाच वाजता ग्रेटर कैलाश-2मधील सीनियर सिटीजन केअर होम या नर्सिंग होमला ही आग लागली. पहाटे सर्वचजण झोपेत होते. नर्सिंगमधला स्टाफ आणि रुग्णही झोपेत होते. त्यावेळी आग लागल्याने सुरुवातीला कुणाला काहीच कळलं नाही. मात्र, जसजशी आग तीव्र होत गेली आणि गरम वाफा येऊ लागल्याने रुग्णालयात एकच खळबळ उडाली.

हे सुद्धा वाचा

रुग्णालयातील स्टाफ आणि रुग्णांनी एकच आक्रोश करत धावपळ सुरू केली. जो तो आपला जीव वाचवण्यासाठी पळू लागला. त्यामुळे अनेकांना पळता पळता मारही लागला. तर या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अनेकांना मारही लागला आहे.

आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. दुसरीकडे अग्निशमन दलाच्या काही जवानांनी लोकाना वाचवण्याचा प्रयत्नही सुरू केला. आतापर्यंत सहा लोकांची सुटका करण्यात आली आहे.

ही आग अत्यंत भीषण होती. कडाक्याची थंडी आणि गार हवा यामुळे आगीने लगेच पेट घेतला. वाऱ्याच्या वेगाने आगही पटकन पसरली. त्यामुळे सर्वत्र अग्नितांडव झालं. धूर आणि आगीचे लोळ पाहून आजूबाजूचे लोकही धास्तावले. काही लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, तासा दीडतासाच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. मात्र, अजूनही आगीच्या ज्वाळा निघताना दिसत असून धूरही निघत आहे. लवकरच ही आग पूर्णपणे विझवली जाणार आहे. त्यानंतर कुलिंग ऑपरेशन करण्यात येणार आहे. सध्या आग पूर्णपणे विझवण्याबरोबरच रुग्णालयात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...