इटावा (उत्तर प्रदेश) | 15 नोव्हेंबर 2023 : उत्तर प्रदेशच्या इटावा जिल्ह्यात मोठी दुर्दैवी घटना घडली आहे. इटावा जिल्ह्यात सराय भूपत रेल्वे स्थानकाजवळ दरभंगा-इटावा एक्सप्रेसला भीषण आग लागली आहे. या एक्सप्रेसच्या तब्बल 3 डब्ब्यांना भीषण आग लागली आहे. ट्रेनमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र समजू शकलेलं नाही. पण आगीचे धक्कादायक व्हिडीओ समोर आली आहे. आगीच्या व्हिडीओमधून आग किती भीषण लागली आहे याची प्रचिती येताना दिसत आहे. सध्या घटनास्थळी प्रशासन दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इटावा येथून ही गाडी नवी दिल्लीसाठी रवाना झाली होती. या दरम्यान ट्रेनला भीषण आग लागली. या आगीत जनरल डब्बा पूर्णपणे जळून खाक झालाय. ट्रेनमधून धूर निघत असल्याचं समजस्यानंतर प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. प्रवाशांनी ट्रेनखाली उड्या मारुन आपला जीव वाचवला.
संबंधित घटना ही सराय भूपत रेल्वे स्थानकाजवळ संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. घटना घडली तेव्हा रेल्वेचा वेग हा 20 ते 30 किमीच्या दरम्यान होता. पण डब्ब्यात क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी होते, अशी देखील माहिती समोर आली आहे.
Fire broke out in coach S-1 of train number – 02570 (Humsafar Express) going from New Delhi to Darbhanga near Sarai Bhupat railway station in Etawah. Rail traffic stopped!! pic.twitter.com/5XzfISlStK
— Ravi Chaturvedi (@Ravi4Bharat) November 15, 2023
मिळालेल्या माहितीनुसार, सराय भूपत स्टेशनला ट्रेन जात असताना स्टेशन मास्तरला स्लिपर कोचमध्ये धूर पाहिला होता. स्टेशन मास्तरवे वॉकी टॉकीच्या मदतीने ट्रेन ड्रायव्हर आणि गार्डला सूचना केली होती. त्यानंतर ट्रेन थांबवण्यात आली आणि पावर ऑफ केलं गेलं. यानंतर स्लिपर कोचमधील प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. कोणत्या प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.