India-Israel : युद्धा दरम्यान इस्रायलसाठी भारतीय रवाना, लाखो रुपये पगार घेऊन करणार ‘हे’ काम
India-Israel Relation : इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरु असताना भारतातून कामगारांची एक तुकडी इस्रायलला रवाना झाली आहे. या कामगारांना महिन्याला या कामसाठी लाखो रुपये वेतन मिळणार आहे. इस्रायलला जाण्यासाठी या कामगारांची कोणती परीक्षा घेण्यात आली?. कुठल्या करारातंर्गत या कामगारांचा पाठवण्यात आलय?
हमास आणि इस्रायल दरम्यान युद्ध सुरु असताना भारतीय कामगारांची एक तुकडी मंगळवारी इस्रायलला रवाना झाली. भारतातील इस्रायलचे राजदूत नाओर गिलोन यांच्यानुसार, या तुकडीत 60 भारतीय आहेत. नाओर गिलोन यांन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली. त्यात लिहिलय की, “इस्रायलला जाणाऱ्या भारतीय श्रमिकांची पहिली तुकडी रवाना करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता” इस्रायलने मागच्यावर्षी भारत आणि अन्य देशातून हजारो श्रमिकांची भरती करण्याची घोषणा केली होती. हमास बरोबर युद्ध सुरु असल्याने इस्रायलने हजारो पॅलेस्टिनी कामगारांवर प्रतिबंध घातला आहे. त्यामुळे इस्रायलमध्ये कामगारांची कमतरता निर्माण झाली आहे.
“G2G करारातंर्गत इस्रायलला जाणाऱ्या 60 पेक्षा जास्त भारतीय कंस्ट्रक्शन वर्कर्ससाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. NSDC INDIA आणि अनेक लोकांच्या मेहनतीचा हा परिणाम आहे. या श्रमिकांमुळे भारत-इस्रायलमधील संबंध अधिक दृढ होतील” असं नाओर गिलोन यांनी लिहिल आहे. डिसेंबर 2023 मध्ये इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोनवरुन चर्चा केली. त्यावेळी भारतीय श्रमिकांना इस्रायलला पाठवण्यात आवाहन केलं होतं. दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्यासाठी वर्ष 2018 मध्ये भारत आणि इस्रायलमध्ये गवर्नमेंट टू गवर्नमेंट G2G करार झाला होता.
NSDC INDIA ही कुठली कंपनी?
NSDC INDIA ही पब्लिक-प्रायवेट पार्टनरशिप (पीपीपी) मॉडल अंतर्गत वित्त मंत्रालयाने स्थापन केलेली एक सार्वजनिक लिमिटेड कंपनी आहे. या कंपनी मार्फत भारतीय श्रमिकांना कौशल्य विकास आणि व्यावसायिक प्रशिक्षण दिलं जातं. दुसऱ्या देशात राहणारे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या देखरेखीखाली असतात.
कोणाची परीक्षा घेतलेली?
मागच्या काही महिन्यात NSDC INDIA आणि इस्रायली कंपनीने हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेकडो कामगारांची परीक्षा घेतली होती. दगडी बांधकाम, सूतारकाम, टायलिंग आणि बार-बेंडिंगची काम करणारे हे कामगार होते. नोव्हेंबर 2023 मध्ये श्रमिकांसंदर्भात भारत-इस्रायलमध्ये एक करार झाला.
Today we had a farewell event from the first batch of 60+ Indian construction workers going to Israel under the G2G agreement. This is an outcome of hard work of many, including @NSDCINDIA. I’m sure that the workers become ‘ambassadors’ of the great P2P relations between 🇮🇳🇮🇱. pic.twitter.com/S94OQz4BTG
— Naor Gilon (@NaorGilon) April 2, 2024
महिन्याला किती लाख वेतन?
NSDC वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, फ्रेमवर्क वर्कर आणि बार-वेंडर्ससाठी प्रत्येकी तीन-तीन हजार नोकऱ्या उपलब्ध आहेत. त्या शिवाय टाइलिंग आणि प्लेटिंगसाठी दोन हजार नोकऱ्या आहेत. जाहीरातीनुसार, महिन्याला एक लाख 37 हजारपेक्षा जास्त वेतन मिळेल. येण्या-जाण्याच भाडं, टॅक्स, हेल्थ इंश्योरेंस आणि सोशल सिक्युरिटी इंश्योरेंस पैसे श्रमिकांना भरावे लागतील.