पहिली निवडणूक, पहिल्यांदाच आमदार आणि थेट उपमुख्यमंत्रीपदी वर्णी

ओडिशात भाजपने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नावांची घोषणा केली आहे. ओडिशामध्ये पहिल्यांदाच भाजप सत्तेत आलं आहे. त्यामुळे २४ वर्षानंतर येथे सत्तापरिवर्तन झाले आहे. भाजपकडून निवडणूक लढवणाऱ्या प्रवती परिदा कोण आहेत जाणून घ्या.

पहिली निवडणूक, पहिल्यांदाच आमदार आणि थेट उपमुख्यमंत्रीपदी वर्णी
Follow us
| Updated on: Jun 11, 2024 | 9:57 PM

ओडिशाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवलं आहे. ओडिशामध्ये पहिल्यांदाच भाजपची सत्ता आली आहे. ओडिशाचा पुढील मुख्यमंत्री मोहन माझी होणार आहेत. तर भाजपने दोन उपमुख्यमंत्र्यांची देखील घोषणा केली आहे. के.व्ही. सिंगदेव आणि प्रवती परिदा हे उपमुख्यमंत्री असतील. ओडिशाच्या पहिल्या भाजप सरकारमध्ये उपमुख्यमंत्री बनणाऱ्या प्रवती परिदा कोण आहेत हे जाणून घेऊया.

-प्रवती परिदा यांनी पुरीच्या निमापारा मतदारसंघातून २०२४ ची ओडिशा विधानसभा निवडणूक लढवली होती. पहिल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. 57 वर्षीय प्रवती परिदा या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून देखील ओळखल्या जातात. प्रवती परिदा यांचे पती सरकारी अधिकारी होते, ते काही वर्षांपूर्वी निवृत्त झालेत. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये एमए केलेल्या प्रवती परिदा यांनी उत्कल विद्यापीठातून एलएलबीही केले आहे. त्यांनी काही काळ ओरिसा उच्च न्यायालयात वकील म्हणूनही काम केले.

निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, प्रवती परिदा यांची एकूण संपत्ती 3.6 कोटी रुपये आहे. यामध्ये 2 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि 1.7 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता समाविष्ट आहे. प्रवती परिदा यांनी एकूण 31.8 लाख रुपये उत्पन्न घोषित केले आहे, त्यापैकी 9 लाख रुपये तिची स्वतःची कमाई आहे. ओडिशाच्या नवीन उपमुख्यमंत्री होणाऱ्या प्रवती परिदा यांच्यावर ४५ लाखांचे कर्ज आहे. महत्त्वाची गोष्ट, प्रवती परिदा यांच्यावर 9 गुन्हे दाखल आहेत.

प्रवती परिदा पुरीच्या निमापारा विधानसभा मतदारसंघातून आमदार झाल्या आहेत. हे ओडिशाच्या किनारपट्टी भागात वसलेले ठिकाण आहे. येथे ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील मतदार आहेत. भाजपने प्रवती परिदा यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत त्यांना सुमारे ४९ टक्के मते मिळाली. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला ४६ टक्के मते मिळाली होती.

ओडिशाच्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी १२ जून रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. त्याआधी भुवनेश्वरमध्ये पंतप्रधान मोदींचा रोड शो देखील होणार आहे. लोकांनी दिलेल्या बहुमतामुळे ते लोकांचे आभार मानणार आहेत.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.