रशियाच्या Sputnik Vची पहिली खेप आली; हैदराबादला विमान पोहोचले
एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढलेला असतानाच देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण अभियान हाती घेण्यात आलं आहे. (First lot of Sputnik V vaccines from Russia arrive in Hyderabad)
हैदराबाद: एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढलेला असतानाच देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण अभियान हाती घेण्यात आलं आहे. देशात लसींची कमतरता जाणवत असल्याने भारताने रशियाकडून स्पुतनिक व्ही या लसींचा साठा मागवला असून या लसींची पहिली खेप भारतात आली आहे. दीड लाख स्पुतनिक व्ही लसीचे डोस भारतात दाखल झाले असून हैदराबाद विमानतळावर लसी घेऊन आलेले विमान पोहोचले आहे. रशियाकडून या महिन्यात भारताला आणखी 30 लाख लस मिळणार आहेत. (First lot of Sputnik V vaccines from Russia arrive in Hyderabad)
स्पुतनिक व्ही व्हॅक्सिन डॉ. रेड्डी यांच्या लॅबोरेटरीजमध्ये पाठवण्यात येणार आहे. 13 एप्रिल रोजी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने स्पुतनिक व्हीच्या एमर्जन्सी वापरण्यास मंजुरी दिली आहे. स्पुतनिक व्हीला मंजुरी देणारा भारत हा जगातील 60 वा देश बनला आहे.
भारतात दरवर्षी 85 कोटी डोस तयार होणार
भारतात स्पुतनिक व्हीचे दरवर्षी 85 कोटीहून अधिक डोस तयार करण्यात येणरा आहेत, असं रशियाने म्हटलं आहे. या व्हॅक्सिनचे वैज्ञानिक परीक्षण पूर्ण करण्यात आलेलं आहे. भारतातील या लसीचे वैज्ञानिक परीक्षण सकारात्मक आहे. भारतात डॉ. रेड्डीज यांच्या मदतीने हे परीक्षण करण्यात आलं आहे.
भारत सर्वात मोठा देश
लोकसंख्येच्या प्रमाणात स्पुतनिक व्हीच्या लसी घेणारा भारत हा जगातील सर्वात मोठा देश आहे. तसेच स्पुतनिक व्हीच्या उत्पादनातही भारत सर्वात पुढे आहे. स्पुतनिक व्ही ही लस भारतात कोरोना विरोधात वापरली जाणारी ही तिसरी लस आहे. या आधी भारताने कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिली होती.
Sputnik V 91.6 टक्क्यांपर्यंत प्रभावी
Sputnik V 91.6 टक्क्यांपर्यंत प्रभावी असल्याचा दावा केला जात आहे. अमेरिकेत बनवलेल्या फायझर आणि मॉडर्ना या लसीमध्ये आतापर्यंत केवळ 90% प्रभावित दिसून आलीय. देशात कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोनच लस उपलब्ध आहेत. भारत बायोटेकची कोवॅक्सिनची प्रभावित 81 टक्के आहे. त्याच वेळी सीरम इन्स्टिट्यूट (एसआयआय) द्वारा निर्मित कोविशिल्डची कार्यक्षमता 80 टक्क्यांपर्यंत आहे. आता रशियन लसीनंतर Sputnik V ही भारतातील एकमेव लस असेल, ज्याची प्रभावशीलता 90 टक्क्यांहून अधिक आहे. (First lot of Sputnik V vaccines from Russia arrive in Hyderabad)
महाफास्ट न्यूज 100 | MahaFast News 100 | 7 AM | 1 May 2021 https://t.co/eG83Jcs9Yz #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 1, 2021
संबंधित बातम्या:
Maharashtra Coronavirus LIVE Update : कोल्हापुरात ऑक्सिजन न मिळाल्याने कोरोना रुग्णांचा मृत्यू
कोरोनाची तिसरी लाट गृहीत धरूनच काटेकोर नियोजन करा; अजित पवारांचे प्रशासनाला आदेश
1 मेपासून रशियाची Sputnik V लस भारताच्या लसीकरणाचा एक भाग असणार, जाणून घ्या सर्वकाही
(First lot of Sputnik V vaccines from Russia arrive in Hyderabad)