पतीचा राग आला अन् घर सोडले; महिलेवर आठवडाभर 5 जणांकडून सामूहिक बलात्कार

काही तासांनंतर तिन्ही आरोपींनी खोलीत जाऊन तिचे लैंगिक शोषण केले, असे अधिकाऱ्याने सांगितले. आणखी दोन ऑटोचालकही या गुन्ह्यात सामील झाले. पीडितेला 17 ऑक्टोबरच्या रात्रीपर्यंत त्याच खोलीत बंदिस्त ठेवण्यात आले होते.

पतीचा राग आला अन् घर सोडले; महिलेवर आठवडाभर 5 जणांकडून सामूहिक बलात्कार
पतीचा राग आला अन् घर सोडले; आठवडाभर 5 जणांकडून सामूहिक बलात्कार
Follow us
| Updated on: Oct 19, 2021 | 5:28 PM

पाटणा : पतीचा राग आल्याने घर सोडून गेलेल्या एका विवाहितेवर पाच जणांनी कथितरीत्या आठवडाभर सामूहिक बलात्कार केल्याची घटना पटनामध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 ऑक्टोबर रोजी पतीसोबत झालेल्या वादानंतर ही महिला घर सोडून गेली होती. तिने कोलकाताला जाण्याचा निर्णय घेतला आणि ट्रेन पकडण्यासाठी पाटणा जंक्शन गाठले. यानंतर ती महिला एका हॉटेलमध्ये गेली, जिथे तिने हॉटेल मालकाला कोलकाताला जाणाऱ्या ट्रेनबद्दल विचारले. (Five gang-raped a woman in Patna for a week)

हॉटेल मालक मित्राकडे घेऊन गेला

जक्कनपूर पोलीस ठाण्याच्या तपास अधिकाऱ्याने सांगितले की, हॉटेलचा मालक गोपाल याने त्याचा मित्र अमितला त्या महिलेबद्दल सांगितले आणि दोघे तिला अजय नावाच्या दुसऱ्या व्यक्तीकडे घेऊन गेले, ज्याने करबीघिया भागात खोलीची व्यवस्था केली, जिथे त्याने तिला ट्रेन येईपर्यंत थांबायला सांगितले.

चोवीस तास नजकैदेत ठेवले

काही तासांनंतर तिन्ही आरोपींनी खोलीत जाऊन तिचे लैंगिक शोषण केले, असे अधिकाऱ्याने सांगितले. आणखी दोन ऑटोचालकही या गुन्ह्यात सामील झाले. पीडितेला 17 ऑक्टोबरच्या रात्रीपर्यंत त्याच खोलीत बंदिस्त ठेवण्यात आले होते. एक आरोपी तिच्यावर नजर ठेवण्यासाठी चोवीस तास खोलीच्या बाहेर राहायचा.

पतीने दाखल केली मिसिंगची तक्रार

जेव्हा पीडित महिला कोलकाताला पोहचली नाही, तेव्हा तिच्या पतीने जक्कनपूर पोलिस स्टेशनमध्ये हरवल्याची तक्रार दाखल केली. तिचा मोबाईल सर्विलांसवर ठेवण्यात आला होता, ज्यामध्ये पाटणा जंक्शन हे तिचे शेवटचे स्थान असल्याचे आढळले. या अंतर्गत शोधमोहीम सुरू करण्यात आली.

5 आरोपींना अटक

गुप्त माहितीच्या आधारे पोलीस महिलेला ज्या घरात डांबून ठेवले होते तिथे पोहचत या महिलेची सुटका केली आणि एक आरोपी गोलू याला अटक करण्यात आली. महिलेने दिलेल्या माहितीच्या आधारे इतर आरोपी गोपाल कुमार, अमित कुमार, अजय कुमार आणि अरुण यांनाही अटक करण्यात आली आहे.

छेडछाड करणाऱ्या दारुड्याला महिलेने भररस्त्यात चोपले

मध्य प्रदेशातील अनुपपूरमध्ये एका दारुड्याला महिलेचा विनयभंग करणे महागात पडले. महिलेने त्याला रस्त्याच्या मध्यभागी ओढत आणले आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. असे सांगितले जात आहे की, दारूच्या नशेत प्रवासादरम्यान महिलेशी गैरवर्तन केले. बराच काळ महिलेने त्याचा उर्मटपणा सहन केला. पण बस अनुपपूर बस स्टँडवर पोहोचताच महिलेने त्याला खाली उतरवले आणि तिला चांगला धडा शिकवला. (Five gang-raped a woman in Patna for a week)

इतर बातम्या

पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर चाकूहल्ला, भररस्त्यात हत्याकांड, नाशकात चाललंय काय?

आलिशान हॉटेलमध्ये सुट्ट्यांसाठी गेलेल्या कुटुंबातील चौघांचा मृत्यू, तीन ठिकाणी चौघांचे मृतदेह

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.