माणूस नव्हे सैतान! संपत्तीच्या हव्यासातून 20 वर्षांत कुटुंबातील 5 जणांची हत्या

आरोपीने मागील 20 वर्षांच्या कालावधीत हळूहळू आपल्या कुटुंबातील पाच सदस्यांचा खून केला. त्याने हे सर्व गुन्हे अशाप्रकारे केले की कोणालाही त्याच्या गुन्हेगारी कृत्यावर संशय आला नव्हता. अखेर 20 वर्षांनंतर त्याला पोलिसांनी पकडले.

माणूस नव्हे सैतान! संपत्तीच्या हव्यासातून 20 वर्षांत कुटुंबातील 5 जणांची हत्या
कांदिवलीत तरुणाची निर्घृण हत्या
Follow us
| Updated on: Sep 25, 2021 | 5:09 PM

गाझियाबाद : एकदा का माणसाला पैसे आणि मालमत्तेची लालच लागली की तो माणूस काहीही करायला तयार होतो. अगदी संपत्तीच्या हव्यासातून आपल्याच रक्ताच्या नात्याच्या लोकांचे रक्त पिण्यासही काही सैतानी वृत्तीचे लोक मागे पुढे पाहत नाहीत. उत्तरप्रदेशच्या गाझियाबादमध्ये अशीच धक्कादायक घटना घडली असून या घटनेतील सीरिअल किलरने मानवतेला काळिमा फासणारे अत्यंत क्रूर कृत्य केले. मागील 20 वर्षात त्याने घरातच राहून आपल्याच कुटुंबातील 5 जणांच्या हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या हत्याकांडामुळे संपूर्ण उत्तरप्रदेश हादरून गेले आहे. आरोपी अडीच कोटी रुपयांच्या हव्यासातून राक्षस बनल्याचे समोर आले आहे. (Five members of a family were killed in 20 years out of lust for wealth, in Ghaziabad)

आरोपीने मागील 20 वर्षांच्या कालावधीत हळूहळू आपल्या कुटुंबातील पाच सदस्यांचा खून केला. त्याने हे सर्व गुन्हे अशाप्रकारे केले की कोणालाही त्याच्या गुन्हेगारी कृत्यावर संशय आला नव्हता. अखेर 20 वर्षांनंतर त्याला पोलिसांनी पकडले आणि मालमत्तेच्या हव्यासातून त्याने केलेल्या सैतानी कृत्याचा बुरखा फाडला गेला. क्राइम किंवा एडव्हेंचर चित्रपटांमधील कथानकाला साजेसे कृत्य त्याने केले आहे. त्याच्या या कृत्याने सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे. कुटुंबातील पाचपैकी तिघांची हत्या त्याने स्वत:च्या हाताने केली, तर दोघांच्या हत्येसाठी मारेकऱ्यांना सुपारी दिली होती, असे पोलीस तपासात उघड झाले आहे.

नेमके प्रकरण काय व कुठले?

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, ही घटना गाजियाबाद जिल्ह्यातील मुरादनगर गाव बसंतपूर सैंथली येथील आहे. येथे राहणारा शेतकरी लीलू त्यागीने स्वतःच्या कुटुंबातील पाच जणांना ठार केल्याप्रकरणी त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने 20 वर्षांत एक-एक करीत 5 जणांची हत्या केली. हे हत्याकांड घडवून आणताना त्याने बुलंदशहर जिल्ह्यातील निवृत्त पोलीस निरीक्षक सुरेंद्र त्यागीला 4 लाख रुपयांची सुपारी देऊन भावाची हत्या घडवून आणली. पोलिसांनी 5 व्या हत्येचा खुलासा करताना आरोपीचे बिंग फोडले आहे. पोलिसांनी आरोपी लीलूबरोबरच सुरेंद्र आणि सुपारी किलर राहुल या अन्य दोघा आरोपींनाही अटक केली आहे. 48 वर्षांचा आरोपी लीलूने गुन्हा कबुल केला आहे. हे सर्व सैतानी कृत्य एकूलत्या एका मुलासाठी केल्याचे पोलिसांना सांगितले. यासाठी त्याने दोन्ही भावांच्या 4 मुलांसह एक भाऊ सुधीरची हत्या केली. तसेच दुसरा भाऊ ब्रजेशला मारण्याच्या तयारीत होता. त्याआधीच तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

मोठ्या भावाचे संपूर्ण कुटुंब संपले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लीलूने मोठा भाऊ सुधीरचा खून केल्यानंतर त्याची आठ वर्षांची लहान मुलगी पायल हिला विष देऊन ठार मारले. दोन-तीन वर्षांनी सुधीरची मोठी मुलगी पारुलची हत्या करून मृतदेह नदीत फेकून देण्यात आला. त्यानंतर मृत भावाच्या पत्नीसोबत लग्न केला. जेव्हा दोघांना मुलगा झाला, त्यानंतर त्याने सर्व मालमत्ता मुलाला मिळावी यासाठी आणखी सैतानी प्रयत्न सुरू ठेवले होते. त्याने 2009 मध्ये तिसरी आणि 2013 मध्ये चौथी हत्या केली. तसेच गेल्या महिन्यात म्हणजेच 8 ऑगस्ट 2021 रोजी त्याने दुसऱ्या पुतण्याची सुपारी देऊन हत्या केली. यातच मुलगा रागाने पळून गेल्याचे त्याने सांगितले. मात्र तरीही त्याच्या पालकांनी पोलिसात तक्रार नोंदवली. यानंतर पोलिसांनी संपूर्ण हत्याकांडाचा खुलासा केला.

हत्याकांडाचा मास्टरमाइंड सेवानिवृत्त पोलीस अधिकारी

या संपूर्ण हत्याकांडात सामील असलेले बुलंदशहर जिल्ह्यातील निवृत्त निरीक्षक सुरेंद्र त्यागी यांनी हे सनसनाटी हत्याकांड घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यागी हा हत्या आणि पुरावे नष्ट करण्यासाठी सुमारे 4 लाख रुपये घेत असे तसेच हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यातही तो महत्त्वाचा मदत करायचा, अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. (Five members of a family were killed in 20 years out of lust for wealth, in Ghaziabad)

इतर बातम्या

धड धड वाढली, नाशिकमध्ये कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा हजाराच्या पुढे; सिन्नर गेले 296 वर

रेल्वे, संसदीय कार्यसह सर्व समित्यांचे तडकाफडकी राजीनामे; गोपाळ शेट्टी यांची फेसबुक लाईव्हवरून मोठी घोषणा

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.