Sonali Phogat: उत्तेजनेसाठी की मारण्यासाठी? सोनाली फोगट यांना देण्यात आले होते मेथामफेटामाईन, जाणून घ्या किती भयंकर?

तपासात हे समोर आले आहे की दत्ता प्रसाद गावकर याने कथित प्रकरणात सुखविंदर आणि सुधीर यांना ड्रग्जचा पुरवठा केला होता. ज्या हॉटेलमध्ये सोनाली फोगाट उतरल्या होत्या, त्या हॉटेलात गावकर हा कर्मचारी आहे. दोन्ही आरोपींनी गावकरकडून ड्रग्ज विकत घेतल्याची कबुली दिली आहे. त्यांच्या कबुलीनाम्यानंतर मादक पदार्थांची विक्री करण्याचा संशयावरुन दत्ता गावकरला अटक करण्यात आली आहे.

Sonali Phogat: उत्तेजनेसाठी की मारण्यासाठी? सोनाली फोगट यांना देण्यात आले होते मेथामफेटामाईन, जाणून घ्या किती भयंकर?
सोनाली प्रकरणात नवी माहितीImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 28, 2022 | 4:28 PM

पणजी- भाजपा नेत्या सोनाली फोगट(Sonali Phogat)यांच्या मृत्यूप्रकरणात आता आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. गोव्याच्या कर्लीज रेस्टॉरंटमध्ये आरोपींनी सोनालींना मेथामफेटामाईन (Methamphetamine)नावाचे ड्रग्ज दिले होते. अंजुना पोलिसांनी कर्लीज रेस्टरंटच्या वॉशरुममधून हे ड्रग्ज जप्त केले आहे. या ड्रग्जच्या तपासणीनंतर हे ड्रग्ज, मेथामफेटाईन असल्याचं समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात आत्तापर्यंत चार जणांना अटक (four arrested)केली आहे. त्यात सोनाली यांचा पीए सुधीर सांगवान, त्याचा सहकारी सुखविंदर सिंह, रेस्टॉरंटचे मालक एडविन न्यूस आणि ड्रग्ज पेडलर दत्ता गावकर यांचा समावेश आहे. सुधीर आणि सुखविंदर यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर न्यून्स आणि गावकर यांच्याविरोधात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दत्ता गावकरने दिले होते ड्रग्ज

तपासात हे समोर आले आहे की दत्ता प्रसाद गावकर याने कथित प्रकरणात सुखविंदर आणि सुधीर यांना ड्रग्जचा पुरवठा केला होता. ज्या हॉटेलमध्ये सोनाली फोगाट उतरल्या होत्या, त्या हॉटेलात गावकर हा कर्मचारी आहे. दोन्ही आरोपींनी गावकरकडून ड्रग्ज विकत घेतल्याची कबुली दिली आहे. त्यांच्या कबुलीनाम्यानंतर मादक पदार्थांची विक्री करण्याचा संशयावरुन दत्ता गावकरला अटक करण्यात आली आहे.

काय आहे Methamphetamine?

मेथामफेटामाइम हे अत्यंत घातक आणि शक्तीशाली ड्रग्ज आहे. जर कुणी हे घेण्यास सुरुवात केली तर या ड्रग्जचे व्यसन झपाट्याने लागते. मेथामफेटामाइम ड्रग्ज घेतल्याने सेंट्रल नर्व्हस सिस्टिम प्रभावित होते.

हे सुद्धा वाचा

कसे असते मेथामफेटामाइम?

मेथामफेटामाइम हे एका प्रकाराचे क्रिस्टल ड्रग्ज आहे. हे दिसताना काचेच्या तुकड्यासारखे दिसते. पाहताना हे चमकदार दिसत राहते. या ड्रग्जला जर केमिकलच्या रुपात पाहिले तर हे एम्फैटेमिनप्रमाणे दिसते. याचा वापर हायपर एक्टिविटी डिसऑर्डर आणि नार्कोलेप्सी, झोप न येणे यासारख्या आजारांवर उपचार म्हणून करणाऱ्या औषधात केला जातो.

कसे घेतले जाते हे ड्रग्ज

मेथामफेटामाइम ड्रग्जचे व्यसनी असलेले लोक अनेक प्रकारांनी हे ड्रग्ज घेतात. कुणी याला सिगरेटमधून, गोळीतून घेतात. तर काही जण हे श्वासातून घेतात. अनेक जण पाणी किंवा दारुत टाकूनही हे ड्रग्ज सेवन करतात. सोनालीच्या प्रकरणात हे पाण्यातून मिसळून देण्यात आले होते.

मेथामफेटामाइमचा मेंदूवर काय होतो परिणाम

मेथामफेटामाइम ड्रग्जमुळे मेंदूतील डोपामाईनची मात्रा वाढते. डेपामाईन न्यूरो ट्रान्समीटर असतो. यातून मेंदूच्या सर्व पेशींमध्ये सिग्नल जात असतात. डोपामाईनमुळे आपला मूड चांगला राहण्यास मदत होत असते. जेव्हा आपल्याला आनंद होतो किंवा जेव्हा आपण जेवत असतो तेव्हा डोपामाइन सक्रिय होत असते. यामुळे शरिराच्या हालचाली, प्रेरणा आणि व्यवहारात अनेक परिणाम होत असतो. डोपामाईन हा असा एक केमिकल मेसेंजर आहे ज्यामुळे मेंदूतील अनेक बाबी तो क्रियाशील करीत असतो.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.