G20 summit | जी 20 प्रतिष्ठेचा विषय, सुरक्षेसाठी भारताने उचललं सर्वात मोठ पाऊल
G20 summit | जगभरातील मोठे नेते या परिषदेसाठी भारतात येणार आहेत. G20 परिषदेसाठी भारताने सर्वोच्च स्तरावरची सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. ही परिषद म्हणजे एकप्रकारे भारताच्या प्रतिष्ठेचा विषय आहे. त्यामुळे कुठलाही धोका कमी लेखून चालणार नाही.

नवी दिल्ली : भारतात पुढच्या आठवड्यात G20 च्या रुपाने एक महत्त्वाची परिषद होत आहे. भारतासाठी ही परिषद म्हणजे प्रतिष्ठेचा विषय आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासह जगभरातील अनेक मोठे नेते या परिषदेला उपस्थिती लावणार आहेत. पुढच्या आठवड्यात 9 आणि 10 सप्टेंबरला ही परिषद होत आहे. या परिषदेसाठी सरकारने दिल्ली-NCR क्षेत्रात खास तयारी केली आहे. अनेक महागड्या हॉटेल्समध्ये रुम बुक करण्यात आल्या आहेत. खास लग्जरी कारस भाड्यावर घेण्यात येणार आहेत. या परिषदेसाठी जर्मनीहून खास मेबॅक कार मागवण्यात आली आहे. एकूणच G20 परिषदेसाठी जय्यत तयारी सुरु आहे.
या परिषदेसाठी जभरातील महत्त्वाचे नेते देशात येणार आहेत. त्यांची सुरक्षा महत्त्वाचा विषय आहे. एखाद्या छोट्याशा अप्रिय घटनेमुळे सुद्धा सर्व धुळीला मिळू शकतं. म्हणून सरकार कुठलाही धोका पत्करणार नाहीय. रेल्व,रस्ते मार्गाबरोबर हवाई सुरक्षा देखील तितकीच महत्त्वाची आहे. G20 परिषदेसाठी हवाई सुरक्षा अधिक मजबूत करण्यात आली आहे. फायटर जेट्स, जमिनीवरुन हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र, ड्रोन-विरोधी सिस्टिम, हवाई धोक्याची आगाऊ कल्पना देणारे अवॉक्स विमाने तैनात करण्यात येणार आहेत. “इंडियन एअर फोर्सच ऑपरेशन डायरेक्शन सेंटर जॉइंट कंट्रोल अँड एनलिसिस सेंटरशी समन्वय साधून असेल” अशी माहिती सूत्रांनी दिली.
ऑपरेशन डायरेक्शन सेंटर काय ठरवणार?
“हवाई हल्ला होणार असेल, तर ऑपरेशन डायरेक्शन सेंटर ठरवेल, की टार्गेटला लक्ष्य करण्यासाठी कुठल्या अस्त्राचा वापर करायचा” असं सूत्राने सांगितलं. G20 परिषद हा भारताच्या प्रतिष्ठेचा विषय आहे. भारताच्या शत्रूंना याची कल्पना आहे. त्यामुळे कुठल्याही धोक्याला कमी लेखून चालणार नाही. प्रजासत्ताक दिन, स्वांतत्र्य दिन या दिवशी हवाई हल्ला परतवून लावण्यासाठची ज्या लेव्हलची सिस्टिम तैनात असते. तशीच किंबहुना त्यापेक्षा जास्त तयारी G20 परिषदेसाठी आहे. राफेल, मिराज-2000, सुखोई-30MKI ही फायटर जेट्स आकाशात गस्त घालतील. अंबाला, बरेली, सिरसा, भतिंडा, ग्वालियर इंडियन एअर फोर्सचे हे तळ सुद्धा कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असतील. धोक्याचा अलार्म वाजताच हवेत झेपवाण्यासाठी एअर बेसवर दोन ते तीन फायटर जेट्स तैनात असतील.