या तीन महिला होणार मंदिराच्या पुजारी, पाहा कुठे झाला निर्णय

देशात प्रथमच तीन महिलांना मंदिरातील पुजारी म्हणून मान मिळाला आहे. या तीन महिलाना सुशिक्षित असून त्यांना पुजारी होण्याचे खास प्रशिक्षण देण्यात आले आहे.

या तीन महिला होणार मंदिराच्या पुजारी, पाहा कुठे झाला निर्णय
WOMEN PRIESTImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Sep 15, 2023 | 1:45 PM

चेन्नई | 15 सप्टेंबर 2023 : कृष्णावेनी, एस. राम्या आणि एन. रंजीता या तामिळनाडूच्या तीन महिलांना मंदिरातील पुजारी म्हणून नियुक्त करण्यात येणार आहे. तामिळनाडूच्या सरकारी विभागाने हा निर्णय घेतला आहे. या तीन महिलांनी पुजारी म्हणून त्यांचे प्रशिक्षण पुर्ण केले आहे. त्यांना लवकरच राज्यातील मंदिरात सहायक पुजारी म्हणून नेमण्यात येणार आहे. हिंदू रिलिजन एण्ड चॅरिटेबल एंडोवमेंट डिपार्टमेंट राज्यात सहा पुजारी प्रशिक्षण शाळा चालविते. या शाळांमध्ये सर्व समुदायातील लोक पुजारी बनण्याचे प्रशिक्षण घेऊ शकतात. पहिल्यांदा या शाळांमध्ये महिलांनी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी या प्रकरणात द्रविडीयन मॉडेलमुळे हे शक्य झाल्याचे म्हटले आहे. एकीकडे महिलांना अपवित्र मानले जाते, त्यांना देवीच्या मंदिरात देखील प्रवेशाची परवानगी दिली जात नव्हती. स्टॅलिन यांनी ट्वीट केले आहे की एकीकडे पायलट आणि अंतराळवीर म्हणून महिला पराक्रम गाजवित असताना मंदिरात पुजारी म्हणून भूमिका निभावता येत नव्हती. एवढच काय देवीच्या मंदिरातही त्यांना अपवित्र मानले जात होते. परंतू आता बदल झाला आहे. तामिळनाडूमध्ये आमच्या द्रविड मॉडेल सरकारने सर्व जातीच्या लोकांना पुजारी म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. आता महिलाही गर्भगृहात पाऊल ठेवत आहेत. समावेशिकता आणि समानतेचे नवे युग आणत आहेत.

एस. राम्या एमएससी, कृष्णावेनीची गणितात पदवी

एस. राम्या कुड्डालोर येथून एमएससी झाल्या आहेत. आधी त्यांना पुजारी प्रशिक्षण अवघड वाटत होते. गणितात पदवी घेतलेल्या कृष्णावेनी यांनी सांगितले की मी देव आणि लोकांची सेवा करु इच्छीत असल्याने या प्रशिक्षणाची निवड केली आहे. राम्या आणि कृष्णावेनी नातेवाईक आहेत. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना एक वर्षांचा हा कोर्स करण्यास प्रेरीत केले. रंजिता हीने बीएससी केले आहे. तिला या अभ्यासक्रमात रस असल्याने प्रवेश केला.

सनातन धर्मावर उदयनिधी यांच्या वादग्रस्त विधानानंतर पाऊल

मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पूत्र उदयनिधी यांनी आपले विधान जाती आधारित समाजाविरोधात होते. परंतू त्याचा विपर्यास केला गेल्याचे म्हटले आहे. भाजपाने या वक्तव्याचा विरोधी पक्षांची आघाडी इंडीयाला घेरण्यासाठी याचा मुद्द्याचा वापर केला. इंडीया आघाडीत यामुळे खळबळ उडाली असून एम.के.स्टॅलिन यांनी आपल्या पार्टीच्या सदस्यांना या मुद्द्यावर पुढे काही बोलू नये असा सल्ला दिला आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.