काँग्रेसच्या बड्या नेत्याला भारतरत्न, मोदी यांनी ट्विट करत दिली माहिती
Bharat Ratna award | केंद्र सरकारने आज तीन लोकांना भारतरत्न सन्मान जाहीर केला. त्यात माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेते नरसिंह राव, चौधरी चरण सिंग आणि शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांचा समावेश आहे. खुद्द पंतप्रधान मोदींनी X वर पोस्ट करून ही माहिती दिली.
नवी दिल्ली, दि. 9 फेब्रुवारी 2024 | केंद्र सरकारने आज तीन जणांना भारतरत्न सन्मान जाहीर केला. त्यात माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेते नरसिंह राव, चौधरी चरण सिंग आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि हरित क्रांतीचे जनक एमएस स्वामीनाथन यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर पोस्ट करून ही माहिती दिली. काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न जाहीर झाला आहे. तसेच बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांनाही भारतरत्न जाहीर केला गेला आहे.
पंतप्रधान मोदी यांची पोस्ट
भारतरत्न पुरस्कारसंदर्भात X वर पोस्ट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांना भारतरत्न देऊन सन्मानित केले जात आहे, हे आमच्या सरकारचे भाग्य आहे. हा सन्मान त्यांनी देशासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाला समर्पित आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि कल्याणासाठी समर्पित केले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असो किंवा देशाचे गृहमंत्री आणि आमदार म्हणूनही त्यांनी राष्ट्र उभारणीला नेहमीच गती दिली. आणीबाणीच्या विरोधातही ते ठामपणे उभे राहिले.आपल्या शेतकरी बंधू-भगिनींप्रती त्यांनी केलेले समर्पण आणि आणीबाणीच्या काळात लोकशाहीप्रती असलेली त्यांची बांधिलकी संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे.
पी. व्ही. नरसिंह राव यांच्याबद्दल काय म्हटले
काँग्रेस नेते आणि माजी पंतप्रधान नरसिंह राव यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करताना पीएम मोदी म्हणाले, ‘माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात येणार आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि अनेक वर्ष खासदार व विधानसभा सदस्य म्हणून त्यांनी केलेले कार्य कायम स्मरणात राहणार आहे. एक प्रतिष्ठित विद्वान आणि राजकारणी म्हणून त्यांनी देशाची सेवा केली आहे. भारताला आर्थिकदृष्ट्या प्रगत बनवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. देशाला समृद्ध करण्यात आणि विकासाचा भक्कम पाया रचण्यात त्यांचे दूरदर्शी नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरले. भारतासाठी त्यांनी जागतिक बाजारपेठेसाठी खुली केली, त्यामुळे आर्थिक विकासाचे नवीन पर्व सुरू झाले. शिवाय, भारताचे परराष्ट्र धोरण, भाषा आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान मोठे आहे.
Delighted to share that our former Prime Minister, Shri PV Narasimha Rao Garu, will be honoured with the Bharat Ratna.
As a distinguished scholar and statesman, Narasimha Rao Garu served India extensively in various capacities. He is equally remembered for the work he did as… pic.twitter.com/lihdk2BzDU
— Narendra Modi (@narendramodi) February 9, 2024
डॉक्टर स्वामीनाथन यांचा गौरव
हरित क्रांतीचे जनक डॉ. एमएस स्वामीनाथन यांच्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिले की, ‘भारत सरकारने डॉ. एमएस स्वामीनाथन भारतरत्न जाहीर केला आहे. त्यांनी आपल्या देशातील कृषी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांचा भारतरत्न देऊन सन्मानित करताना अतिशय आनंद होत आहे. त्यांनी आव्हानात्मक काळात भारताला कृषी क्षेत्रात स्वावलंबी करण्यासाठी मदत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि भारतीय शेतीच्या आधुनिकीकरणासाठी उत्कृष्ट प्रयत्न केले.
ही ही वाचा
एकमेव पाकिस्तानी ज्यांचा भारतरत्नाने सन्मान, भारताचा सर्वोच्च सन्मान का दिला ?