Manmohan Singh : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोना संसर्ग, दिल्लीतील एम्समध्ये दाखल
Manmohan Singh Corona Positive: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोना संसर्ग, दिल्लीतील एम्समध्ये दाखल
नवी दिल्ली: देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे. नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात मनमोहन सिंग यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. कोरोना संसर्गावरुन कालच त्यांनी मोदींना पत्र लिहिलं होतं.(Former PM Manmohan Singh tested corona positive admitted i n AIIMS Delhi)
मनमोहन सिंग यांना कोरोना संसर्ग
Former PM Manmohan Singh tests positive for COVID19, admitted to AIIMS Trauma Centre in Delhi: AIIMS Official
(file photo) pic.twitter.com/zZtbd6POWd
— ANI (@ANI) April 19, 2021
मनमोहन सिंग यांचं नरेंद्र मोदींना पत्र
मनमोहन सिंग यांनी या पत्रातून नरेंद्र मोदी यांचं कोविडमुळे उद्भवलेल्या देशातील समस्यांकडेही लक्ष वेधलं आहे. एकून पाच मुद्द्यांवरून त्यांनी मोदींना सल्लाही दिला आहे. आम्ही किती लसीकरण केलं हे पाहण्यापेक्षा किती लोकसंख्येचं लसीकरण केलं याकडे लक्ष दिलं पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. भारतासहीत संपूर्ण जग गेल्या एक वर्षापासून कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. अनेक आई-वडिलांनी गेल्या वर्षभरापासून आपल्या मुलांना पाहिलेलं नाही. आजी-आजोबांनी आपल्या नातवांना पाहिलेलं नाही. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पाहिलेलं नाही. अनेकांनी आपला रोजगार गमावला आहे. महामारीने लाखो लोकांना गरीबीच्या खाईत ढकललं आहे. पुन्हा कोरोनाची लाट आल्याने लोक भयभीत झाले आहेत. जनजीवन केव्हा सुरळीत होईल? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. कोरोना रोखण्यासाठी आपल्याला बऱ्याच गोष्टी कराव्या लागणार आहेत. मात्र, लसीकरणाचा कार्यक्रम वेगाने वाढवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. माझ्या सूचना तुम्ही अंमलात आणाल याची अपेक्षा आहे, असंही त्यांनी या पत्रात नमूद केलं आहे.
लसीकरणाचं टार्गेट काय?
पुढच्या सहा महिन्यांसाठी लसींची ऑर्डर देण्यात आली आहे. या लसींचं राज्यांना वितरण कसं होणार? याबाबतची माहिती दिली पाहिजे. जर आपल्याला वेळेत लसीकरणाचं टार्गेट पूर्ण करायचं असेल तर पुरेश्या प्रमाणात ऑर्डर दिली पाहिजे. त्यामुळे लसींचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनाही त्यावेळेत उत्पादन करणं शक्य होईल, असं सिंग यांनी म्हटलं आहे.
संबंधित बातम्या: