Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नात पाडला नोटांचा पाऊस, लाखो रुपये जमा करण्यासाठी पाहा कशी जमली गर्दी

एका माजी सरपंचाने आपल्या पुतण्याच्या लग्नासाठी लाखो रुपये उडवल्याचे म्हटलं जाताय. घराच्या छतावर उभे राहून १०० व ५०० रुपयांच्या नोटांचा पाऊस पाडला गेला आहे.

लग्नात पाडला नोटांचा पाऊस, लाखो रुपये जमा करण्यासाठी पाहा कशी जमली गर्दी
गुजरातमध्ये लग्नात नोटांचा पाऊस
Follow us
| Updated on: Feb 19, 2023 | 4:33 PM

मेहसाणा : गुजरातमधील एका लग्नाची बातमी सध्या जोरात व्हायरल होत आहे. अगदी चार दिवसांपुर्वी माजी सरपंचांकडे (former sarpanch) झालेले हे लग्न (marriage) परिसरात नाही तर देशात चर्चेचा विषय बनलाय. या लग्नात असे काय झाले की त्याची चर्चा सोशल मीडियावरसुद्धा जोरात आहे. एका माजी सरपंचाने आपल्या पुतण्याच्या लग्नासाठी लाखो रुपये उडवल्याचे म्हटलं जाताय. घराच्या छतावर उभे राहून १०० व ५०० रुपयांच्या नोटांचा पाऊस पाडला गेला आहे. त्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.

कोणाकडे होते लग्न

गुजरातमधील मेहसाणामध्ये माजी सरपंच करीम यादव यांनी आपल्या पुतण्या रज्जाकच्या लग्नात नोटांचा वर्षाव केला. केकरी तहसीलमधील अनगोळ गावचे ते माजी सरपंच आहेत. त्यांनी घराच्या छतावर उभे राहून १०० आणि ५०० रुपयांच्या नोटा ओवाळल्या, ज्या घेण्यासाठी लोकांचा जमाव घराखाली जमा झाला होता. नोटा उचलण्यासाठी अनेकांमध्ये बाचाबाचीही झाली.

गुजरात लग्न समारंभात नोटांचा पाऊस

नोटा जमा करण्यासाठी गर्दी

रज्जाक याच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी गावात मिरवणूक काढण्यात आली. संध्याकाळी गावात मिरवणूक निघाली, त्यानंतर करीम भाई आणि त्यांचे कुटुंबीय घराच्या छतावर पोहोचले आणि त्यांनी नोटांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली. दहा रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंतच्या नोटा उडवल्या.  या नोटा जमा करण्यासाठी मोठी गर्दी झाली. १६ फेब्रवारी रोजी हे लग्न झाले होते.

करीम यादव नोटा उडवत असताना त्यांचा पुतण्या रज्जाक गावातून मिरवणूक निघाली होती. करीम यादव आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी संपूर्ण गावाला लग्नसोहळ्यात सहभागी करून घेण्यासाठी नोटांचे वाटप केले. नोटा उधळत असताना जोधा-अकबर चित्रपटातील अझिमो-शान शहेनशाह हे गाणे वाजत होते. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

करीम यादव नोटांच्या बंडलमधील नोटा एक एक करुन उडवताना व्हिडिओत दिसत आहेत. घराखाली काही लोक या नोटा गोळा करतानाही दिसत आहेत. लाऊड स्पीकरवर लावलेल्या गाण्यांवर नचता नचता घरासमोर उभे असलेले लोक या नोटा गोळा करताना दिसतात.

अनेकांना धक्का

घरातील लोक आनंद साजरा करण्यासाठी गच्चीवरुन नोटा उधळत असल्याचं चित्र पाहून अनेकांना धक्का बसला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी अशापद्धतीने पैसा उधळणे किंवा दौलतजादा करणं चुकीचं असल्याचं मत व्यक्त केलं आहे.

हा व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. गुजरातमध्ये अशाप्रकारे नोटा उधळण्याची पद्धत फार जुनी आहे. अनेक शुभ कार्यक्रमांमध्ये, गाण्यांच्या कार्यक्रमांमध्ये अशाप्रकारे नोटा उधळल्या जातात.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.